Uncategorized

राज्यातील दस्त नोंदणी कार्यालयांच्या वेळा पूर्ववत

राज्यातील दस्त नोंदणी कार्यालयांच्या वेळा पूर्ववतnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुणे : करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी कार्यालयांची वेळ सरसकट ९.४५ ते ६.१५ अशी करण्यात आली होती.nमात्र, सध्या करोना संसर्ग आटोक्यात आल्याने राज्यातील विविध ठिकाणी निर्बंध शिथिल केले जात आहेत.nत्यामुळे सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर ठिकाणी दस्त नोंदणी कार्यालये सुरू राहणार आहेत.nयाबाबतचे आदेश नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी दिले.nसोमवारपासून (९ ऑगस्ट) मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर ठिकाणची दस्त नोंदणी कार्यालये यापूर्वीच्या विहित वेळेत म्हणजेच सकाळ सत्रातील सकाळी ७.३० ते दुपारी ३.१५, तर दुपार सत्रातील दुपारी एक ते रात्री ८.४५ या वेळेत सुरू राहतील.nतसेच सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सुरू राहून शनिवार आणि रविवारी बंद ठेवण्यात येणार आहेत.nकरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर ठिकाणची दुय्यम निबंधक कार्यालयांचे कामकाज सरसकट सकाळी ९.४५ ते ६.१५ या वेळेत निश्चित करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *