Uncategorized

भारतात पुढील तीन वर्षात अमेरिकेच्या दर्जाचे राष्ट्रीय महामार्ग असतील – नितीन गडकरी

भारतात पुढील तीन वर्षात अमेरिकेच्या दर्जाचे राष्ट्रीय महामार्ग असतील – नितीन गडकरीnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnदेशात अनेक ठिकाणी महामार्गांच्या अवस्थेच्या बाबतीत जनता कायमच नाराज असल्याचं चित्र असतं.nमात्र, येत्या तीनच वर्षांमध्ये हे चित्र बदलणार असल्याचा विश्वास रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.nपुढील तीन वर्षांत देशातले सर्व राष्ट्रीय महामार्ग हे अमेरिकेतल्या महामार्गांसारख्या दर्जाचे असतील,nअसं ते म्हणाले.nगुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या कार्यकालाला ५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त आयोजित कार्यक्रमाला ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.nयावेळी बोलताना गडकरी म्हणाले,nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाने चांगलाच वेग घेतला आहे.nमाझा विश्वास आहे की येत्या तीन वर्षात संपूर्ण देशातले महामार्ग हे अमेरिकेच्या महामार्गांच्या दर्जाचे असतील.nएकेकाळी आपण एका दिवसात फक्त २ किलोमीटरचा रस्ता बांधत होतो.nमात्र आता आपण एका दिवसात ३८ किलोमीटरचा रस्ता बांधतो.nगडकरी यांनी हेही सांगितलं की,nदृतगती मार्ग बांधण्यासंदर्भातले तीन वर्ल्ड रेकॉर्ड्स करण्यात गुजरातचा वाटा आहे.nयावेळी त्यांनी वडोदरा-मुंबई दृतगती मार्ग तसंच सोलापूर विजापूर दृतगती मार्गाचंही उदाहरण दिलं.nत्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की,nसध्या किम आणि वडोदरा यांच्यादरम्यान अंकलेश्वरवरवरून जाणाऱ्या १२५ किलोमीटरच्या दृतगती मार्गाचं ८,७११ कोटींचं काम सुरु आहे.nया वर्षाच्या डिसेंबर अखेरपर्यंत हे काम संपेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *