Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
सामाजिक

सपकळवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी सौ. रुक्मिणी रामचंद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

इंदापूर : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाणाऱ्या सपकळवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सौ. रुक्मिणी रामचंद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे सोसायटीच्या कार्यात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना सभासद व ग्रामस्थांनी व्यक्त केली.
निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बापूराव सपकळ (माजी संचालक, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर), बी. के. सपकळ (माजी संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, इंदापूर), अजित काका सपकळ, ज्ञानेश्वर मामा सपकळ, राजेंद्र सपकळ, विष्णू भुजबळ, पोपट पवार, शत्रुघन घाडगे , पांडुरंग सपकळ, राहुल सपकळ, हेमंत सपकळ, बापूराव जाधव, डी. पी. चव्हाण, कुंभार भाऊ, माने सर तसेच सपकळवाडी व हिंगणेवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सपकळवाडी सोसायटी ही सहकार क्षेत्रातील तसेच स्थानिक राजकारणातील प्रभावी संस्था म्हणून ओळखली जाते. त्यामुळे चेअरमनपदी सौ. रुक्मिणी रामचंद्र चव्हाण यांची झालेली बिनविरोध निवड विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
विशेष म्हणजे, आगामी सपकळवाडी–हिंगणेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली ही निवड राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जात असून, गावातील आगामी राजकीय समीकरणांवर या निवडीचा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन करून सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी, सभासद आणि सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *