Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

बारामती लोकसभा मतदारसंघातील विकास कामांचा तालुकानिहाय आढावा !

पुनम सोनवणे ( बारामती तालुका प्रतिनिधी ) :

बारामती दि २७ तालुका प्रतिनिधी पुनम सोनवणे,
बारामती लोकसभा मतदार संघातील विविध विकासकामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली.

यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विकासकामांचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर चालू असलेली विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासंबंधीची सकारात्मक चर्चा या बैठकीत करण्यात आली.

सोबतच मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गवर चालू असलेली कामे आणि पालखी महार्गावरील कामांचा आढावा घेऊन ती कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच मतदारसंघात खासदार निधीतून पूर्ण करण्यात आलेल्या विकासकामांच्या शेजारी त्याबाबत बोर्ड लावण्यात यावेत अशी सूचना केली. बैठकीसाठी वेळ दिल्याबद्दल अधिक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांचे मनापासून आभार मानले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, पुरंदर तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे, भोर तालुकाध्यक्ष रवींद्र बांदल, बारामती तालुकाध्यक्ष राजेंद्रबापू जगताप, पुणे नगरसेविका अनिता इंगळे, दत्ता आबा चव्हाण, त्रिंबक अण्णा मोकाशी, महारुद्र पाटील, रामभाऊ अण्णा टुले, सुधाकर गायकवाड, अजित शितोळे, संदीप नांगरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *