“तातडीने पावलं उचला”, केंद्राचा महाराष्ट्रासह ३ राज्यांना इशारा!nnकरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरू लागलेला असताना दुसरीकडे देशात म्युकरमायकोसिसपाठोपाठ डेल्टा प्लस (Delta Plus )या करोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला आहे.nसध्या विषाणूच्या या प्रकाराचे देशात फारसे रुग्ण जरी नसले,nतरी त्याची क्षमता आणि त्याच्या प्रसाराचा वेग पाहाता केंद्र सरकारने देशातील तीन राज्यांना तातडीने पावलं उचलण्याचा इशारा दिला आहे.nयामध्ये महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांचा समावेश आहे.nया तीनही राज्यांमध्ये करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे विषाणू रुग्णांमध्ये आढळून आले असून त्यांना वेळीच आवर घालण्यासाठी केंद्राने या राज्यांना डेल्टा प्लसचे रुग्ण आढळलेल्या भागात निर्बंध किंवा तत्सम पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत.nयासंदर्भात केंद्रीय आरोग्य विभागाने या तीनही राज्यांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र पाठवून सतर्क केलं आहे.nदेशातील २२ पैकी १६ रुग्ण महाराष्ट्रात केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,nकरोनाचा डेल्टा व्हेरिएंट भारतासह जगातल्या एकूण ८० देशांमध्ये सापडला आहे.nमात्र, डेल्टा प्लस व्हेरिएंट आत्तापरर्यंत एकूण ९ देशांमध्ये आढळला आहे.nयामध्ये अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन आणि रशिया या देशांचा समावेश आहे.nभारतात डेल्टा प्लसचे एकूण २२ रुग्ण सापडले आहेत.nमात्र, या २२ पैकी १६ रुग्ण महाराष्ट्राच्या रत्नागिरी आणि जळगावमध्ये आढळले आहेत.nत्याशिवाय काही रुग्ण केरळ आणि मध्य प्रदेशमध्ये आढळले आहेत.