Uncategorized

महाराष्ट्रभूषण पुरस्कार हे घरच्यांकडून झालेले कौतुक – आशा भोसले

महाराष्ट्रभूषण पुरस्कार हे घरच्यांकडून झालेले कौतुक -nआशा भोसलेnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnमुंबई : ‘आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले असले तरी ‘महाराष्ट्रभूषण’ हा पुरस्कार वेगळा आहे.nकारण हा माझ्या मातीने केलेला माझा गौरव आहे.nहा पुरस्कार जाहीर होणे म्हणजे घरच्यांकडून माझे कौतुक झाले आहे असे मी मानते,’nअशा शब्दांत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.n‘करोनाचे संकट अजून संपलेले नाही.nत्यात गेल्या आठवडय़ात चिपळूण, सांगली, कोल्हापूर येथे अतिवृष्टीमुळे बरेच नुकसान झाले आहे.nत्यामुळे राज्यातील परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर सन्मान सोहळा आयोजित करावा,’nअशी विनंतीही त्यांनी केली.nराज्य सरकारचा २०२० चा ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे.nत्याबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आशा भोसले यांची त्यांच्या लोअर परळस्थित निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.nया वेळी संगीतकार राहुल रानडे,nसांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते.nया वेळी आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.nया पुरस्कारासाठी आशाताईंची एकमताने निवड करणे,nहा राज्य सरकारचा बहुमानच असल्याचे अमित देशमुख यांनी सांगितले.nदेशमुख यांनी या वेळी आशा भोसले यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र,nत्यांच्या कारकीर्दीवर आधारित ‘सुवर्णरंग’ हे पुस्तक,n‘लोकराज्य’चा अंक भेट म्हणून दिला.nराज्य सरकारतर्फे हा पुरस्कार सोहळा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात येईल,nअशी माहितीही देशमुख यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *