Uncategorized

मेट्रोचं स्वप्न अखेर पूर्ण,अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडली ट्रायल रन

मेट्रोचं स्वप्न अखेर पूर्ण,अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडली ट्रायल रनnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnगेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली पुणे मेट्रो अखेर सकाळी प्रत्यक्षात धावताना पाहायला मिळाली.nगेल्या काही महिन्यांपासून पुणे मेट्रोच्या वेगवेगळ्या टप्प्यांची कामं समांतर पद्धतीने करण्यात येत आहेत.nयाआधी वनाज ते रामवाडी या भागाची चाचणी ७ जुलै रोजी घेण्यात आली होती.nत्यानंतर आता वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्याची चाचणी करण्यात आली.nया टप्प्यातील मेट्रो ट्रायल रनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं.nमेट्रोकडून याच मार्गावर काही दिवसांपूर्वी सरावपूर्व चाचणी घेण्यात आली होती.nचाचणीनंतर ऑक्टोबर अखेपर्यंत मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्याचे महामेट्रोच्या विचाराधीन आहे.nयावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेता गणेश बिडकर, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, महा मेट्रोचे ब्रिजेश दीक्षित, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *