Uncategorized

निर्बंध काही प्रमाणात शिथिल? मुख्यमंत्र्यांची वैद्यकीय तज्ज्ञांशी चर्चा

निर्बंध काही प्रमाणात शिथिल?nमुख्यमंत्र्यांची वैद्यकीय तज्ज्ञांशी चर्चाnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnमुंबई : करोना रुग्णसंख्या घटल्याच्या पाश्र्वभूमीवर १ ऑगस्टपासून राज्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती झाली.nयानुसार दुकानांच्या वेळा वाढवून दिल्या जाणार आहेत.nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तज्ञांचा समावेश असलेल्या कृतिदलाच्या सदस्यांबरोबर चर्चा केल्यावर अंतिम निर्णय घेणार आहेत.nदिल्ली, कर्नाटक आदी राज्यांनी निर्बंध शिथिल केले आहेत.nराज्यात रुग्णसंख्या आणि संसर्गदर कमी झाल्याने निर्बंध शिथिल केले जावेत,nअशी मागणी बहुतेक मंत्र्यांनी केली.nयानुसार येत्या १ तारखेपासून सध्या लागू असलेले र्निबध काही प्रमाणात शिथिल केले जातील.nसध्या सायंकाळी ४ पर्यंत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी आहे.nही वेळ सायंकाळी ७ पर्यंत वाढविली जाण्याची शक्यता आहे.nदुकाने आणि उपहारगृहांच्या वेळेत वाढ करावी ही मागणी  मंत्र्यांनी केली.nराज्यातील करोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या घटली आहे.nमृत्यूदरही जूनमधील २.३८ टक्क्यांवरून १.२४ टक्के  इतका कमी झाला आहे.nउपचाराधीन  रुग्णांची संख्याही  ८२ हजारांवर आली आहे.nही घट ७२.८८ टक्के  आहे.nपुणे, ठाणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या पाच जिल्ह्य़ांत ४९ हजार रुग्ण आहेत.nतर मुंबई, अहमदनगर, सोलापूर, बीड, रत्नागिरी या पाच जिल्ह्य़ांत २० हजार ३८६ रुग्ण आहेत.nअशारितीने एकूण १० जिल्ह्य़ांत राज्यातील एकूण ८२ हजार सक्रीय रुग्णांपैकी ६९ हजार ६०८ रुग्ण आहेत.nम्हणजेच राज्यातील सक्रीय रुग्णांच्या ८४ टक्के  रुग्ण हे या १० जिल्ह्य़ांत आहेत, अशी माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.nतसेच हे १० जिल्हे व उस्मानाबादमध्ये रुग्णवाढीचा साप्ताहिक दर ०.१० टक्के  व त्यापेक्षा अधिक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *