Uncategorized

इंदापूर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीकडून ३ लाख १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त !

इंदापूर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीकडून ३ लाख १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्तnn!०६ घरफोडीचे गुन्हे केले उघड.nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnसविस्तर वृत्त असे कि, इंदापूर पोलीस स्टेशन अंकित बावडा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरक्षक नागनाथ पाटील यांनी दिलेल्या माहिती नुसार दि १९ ऑगस्ट २०२३ रोजी पहाटे तीन वा.चे दरम्यान इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीत रात्रगस्त दरम्यान दरोडा घालण्याचे पूर्वतयारीत असलेल्या टोळीतील इसमांकडे पोलीस कोठडीमध्ये कसून तपास केला असता यातील अटक आरोपी नामे १. दिलीप सयाजी पवार रा.कटफळ ता.बारामती जि.पुणे २.शामराव उर्फ जगताप काळूराम भोसले रा. पिटकेश्वर ता.इंदापूर जि.पुणे ३.खोपेश्वर उर्फ खोप्या शिवा भोसले वय 23 वर्षे रा.पिटकेश्वर ता. इंदापूर जि.पुणे ४.शिवा मिठ्ठू भोसले रा.पिटकेश्वर ता.इंदापूर जि.पुणे (फरार) यांनी मिळून मौजे पीठेवाडी,भगतवाडी,बावडा,निमगाव केतकी,सरस्वतीनगर,भवानीनगर परिसरात चोऱ्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले.nnnnत्यांच्याकडून तपासामध्ये सहा तोळे सोने ०१ नग एल ई डी टी.व्ही अशा एकूण ३ लाख १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सहा घरफोडीचे गुन्हे खालील प्रमाणे उघड करण्यात आले.nnnnसदर कारवाईही श्री अंकित गोयल सो.पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण तसेच मा.श्री आनंद भोईटे सो.अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग,मा.श्री गणेश इंगळे सर उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती यांचे मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार सो,सहा.पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील सो,पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटोळे,सहा.पोलिस फौजदार के.बी.शिंदे,चालक पो.हवा.सुनील बालगुडे,महिला पोलीस हवालदार खंडागळे,माधुरी लडकत,पोलीस नाईक अमोल गायकवाड,सुनिल कदम,कळसाईत, पोलीस शिपाई विनोद लोखंडे,आरिफ सय्यद, अकबर शेख, विशाल चौधर,सुधीर शेळके,दिनेश चोरमले यांनी मिळून केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *