निमसाखरच्या एन.ई.एस.मध्ये वन्यजीव संरक्षक संस्थेमार्फत सर्प जनजागृती कार्यक्रम
nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnशनिवार, दि.१९ : इंदापूर येथील वन्यजीव संरक्षक संस्थेमार्फतnनिमसाखर येथील एन.ई.एस हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे सर्प जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.nnया जनजागृती कार्यक्रमांमध्ये सापाबद्दल असलेले गैरसमज तसेच आपल्या भागातील साप विषारी बिनविषारी व साप चावल्यानंतर करावयाचा प्रथम उपचार, मुलांच्या मनामध्ये सापाबद्दल असलेले प्रश्न त्याची उत्तरे त्यांना समजून सांगण्यात आली.nnयावेळेस वन्यजीव अभ्यासक कीर्तीकुमार लोंढे, वन्यजीव संरक्षक संस्थेचे उपाध्यक्ष अमित अडसूळ,विकास सोनवणे, राजू गाडे तसेच शाळेचे प्राचार्य चंद्रकांत रणवरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थींनी उपस्थित होते.