पूरग्रस्तांना एन.डी.आर.एफ.च्या निकषानुसार तातडीची मदत दिली जाणार – ना. एकनाथ शिंदेnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnराज्यातील पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा मंत्रिमंडळ बैठीकत घेण्यात आला.nया बैठकीत विविध निर्णय़ घेण्यात आले असून,nपूरग्रस्त भागातील नुकसानग्रस्तांच्या मदतीसंदर्भातही निर्णय घेतला गेला आहे.nत्यानुसार आता सुरूवातीला एन.डी.आर.एफ.च्या निकषानुसार तातडीची मदत दिली जाणार आहे.nराज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.nएकनाथ शिंदे म्हणाले की,nआता सुरूवातील तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपये रोखीने मदत देण्याचा निर्णय झाला आहे आणि उर्वतरीत मदत एन.डी.आर.एफ.च्या निकषांप्रमाणे घराचं किंवा आणखी काही नुकसान असेल,nही सगळी मदत एन.डी.आर.एफ.च्या निकषानुसार दिली जाईल.nतसेच, नुकसानीचे एकूण आकडेवारी आल्यानंतर व पूर्ण आढावा आल्यानंतर अधिकची मदत देण्याबाबत निर्णय घेण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली आहे.nअशी देखील एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.nयाचबरोबर, क वर्ग आणि ड वर्ग महापालिका, नगरपालिका व नगरपंचायती यामध्ये काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू कोविडमुळे झालेला आहे.nत्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय शासनाच्यावतीने घेण्यात आलेला आहे.nअसं देखील मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.