Uncategorized

कृषीदुतांनो भारीच! रांगोळीतुन रेखाटला विविध सुचीसह गावचा ‘नकाशा’

कृषीदुतांनो भारीच! रांगोळीतुन रेखाटला विविध सुचीसह गावचा ‘नकाशा’nnscreenshot 20241130 070128 whatsappnnपिठेवाडी गावात ‘कृषिदूतांचा ‘उपक्रमnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnइंदापूर :- अत्याधुनिक तंत्रज्ञानाने गावची शेती… आणि समृद्ध विचाराने लोकांची मन परिवर्तन करण्यासाठी आलेल्या कृषीदुतांनी पिठेवाडी गावचा हुबेहूब नकाशा चक्क रांगोळीतुन रेखाटल्याने गावाकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.nnबारामती कृषी महाविद्यालयाच्ये सुपेकर आदित्य, संदेश शेळके, महेश तोडकर, अथर्व तुरेवाले, रोहन शिंदे, श्रीनिवास इन्नल्ला, हिमांशू टिकोने, मोडक मोहम्मद हे कृषीदुत ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमांतर्गत तीन महिने पिठेवाडी येथे मुक्कामी आहेत. कृषी कार्यानुभव अंतर्गत सुरु असलेल्या अनेक प्रयोगांनी व प्रत्यक्षिकांनी येथील नागरिकांना दिलासा देण्याचे काम या कृषीदुत करत आहेत.nnया कृषीदुतांना संस्थेचे मुख्याधिकारी प्रा. एस. पी. गायकवाड व एस. व्ही. बुरुंगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. या कृषीदुत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ग्रामीण कृषी जागरूकतेविषयी मार्गदर्शन करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतीत जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळेल? माती परीक्षण, पाणी व्यवस्थापण, कीड नियंत्रण, पीक संरक्षण याबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांना आधुनिकतेची कास धरायला प्रवृत्त करत आहेत. यावेळी गावचे सरपंच पप्पू बापू जानकर, उपसरपंच वैभव व्हनखडे, कृषीसेवक अंजली जगताप, महादेव जानकर, नवनाथ मदने व मोठ्या संख्येने प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *