Uncategorized

अनिल देशमुखांच्या मागे ‘सी.बी.आय.’चा ससेमिरा, मुंबई, पुण्यासह १२ ठिकाणी धाडी

अनिल देशमुखांच्या मागे ‘सी.बी.आय.’चा ससेमिरा,nमुंबई, पुण्यासह १२ ठिकाणी धाडीnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnराज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत.nसरकारी तपास यंत्रणा आता आपला दिवसेंदिवस अधिकच घट्ट करत आहेत.n१०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी सी.बी.आय.कडून अनिल देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या १२ ठिकाणांवर छापेमारी केली गेली आहे.nयामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, सांगली व अहमदनगर येथील ठिकाणांचा समावेश आहे.nतर,अहमदनगर आणि मुंबईमध्ये डी.सी.पी. राजू भुजबळ यांच्या घरी आणि पुणे,nमुंबईत ए.सी.पी. संजय पाटील यांच्या निवासस्थानी छापेमारी करण्यात आली आहे.nn*देशमुखांना दिलासा नाहीच!*nnभ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सी.बी.आय.ने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास मे.उच्च न्यायालयाने नकार दिला.nदेशमुखांवरील आरोपांची सी.बी.आय.तर्फे चौकशी सुरू आहे.nअशा वेळी मे.न्यायालयाचा हस्तक्षेप हा सत्य उघड करण्यातील अडथळा ठरू शकतो.nत्यामुळे सी.बी.आय.ला सत्य शोधण्यापासून रोखले जाऊ शकत नाही,nअसे मे.न्यायालयाने देशमुख यांची याचिका फेटाळताना स्पष्ट केले आहे.nआपल्यावरील कारवाईसाठी सी.बी.आय.ने राज्य सरकारची मंजुरी घेणे अनिवार्य होते असा दावा देशमुख यांनी केला होता.nमात्र मे.न्यायालयानेच या प्रकरणी  चौकशीचे आणि पुढील कार्यवाहीचे आदेश दिले होते.nत्यामुळे सरकारच्या पूर्वपरवानगीची गरज नसल्याचेही मे.न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *