Uncategorized

लस घेतलेली नसतानाही प्रमाणपत्र, पोलिसांकडे तक्रार; तांत्रिक घोळ की गैरप्रकार ?

लस घेतलेली नसतानाही प्रमाणपत्र,nपोलिसांकडे तक्रार;nतांत्रिक घोळ की गैरप्रकार ?nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nलस घेतलेली नसताना कांदिवलीतील खासगी रुग्णालयांमधून लसीकरणाचे प्रमाणपत्र दिले गेल्याचा प्रकार समोर आला आहे.nरुग्णालये यासाठी कोविन अ‍ॅपमधील तांत्रिक दोषांकडे बोट दाखवत आहेत.nपोलिसांनी मात्र यासंदर्भात आलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत हा प्रकार कोविन अ‍ॅपमधील तांत्रिक घोळामुळे झाला की यामध्ये गैरप्रकार असावा,nया दिशेने तपास सुरू केला आहे.nनीलेश मेस्त्री (वय ३३) यांनी १४ जुलैच्या रात्री कांदिवलीच्या डहाणूकरवाडी येथील चव्हाण रुग्णालयात कोव्हिशिल्ड लशीकरिता कोविन अ‍ॅपवर नोंदणी केली.nत्यांना १५ जुलैची सकाळी १० ते ११ दरम्यानची वेळ मिळाली.nपरंतु त्या दिवशी कार्यालयीन कामामुळे त्यांना लस घेता आली नाही.nम्हणून त्यांनी पुन्हा नोंदणीसाठी ‘कोविन’ सुरू केले.nत्यावेळी संबंधित रुग्णालयातून त्यांनी लशीचा पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दिसले.nमेस्त्री यांनी म.न.से.चे चारकोप विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांच्या मदतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.nया तक्रारीबाबत चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता,n‘आम्ही तक्रार नोंदवून घेतली आहे.nआणखी एका खासगी रुणालयाबाबत अशीच एक तक्रार आली आहे.nकोविनमधील तांत्रिक घोळामुळे हा प्रकार झाला असावा की गैरप्रकार आहे, याबाबत आम्ही तपास करत आहोत,’nअसे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *