व्यापक लसीकरण हाच उपाय,nकरोना उत्परिवर्तनांच्या धोक्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा…….nnजगातील ८० टक्के व्यक्तींचे लसीकरण झाले तरच विषाणूच्या नवीन उपप्रकारांपासून निर्माण होणारा धोका टळेल,nअसे मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केले आहे.nनवीन विषाणूंमुळे काही प्रमाणात ठिकठिकाणी साथ पसरत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.nजागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन प्रमुख डॉ. मायकेल रायन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,nकरोना साथीतून बाहेर पडण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर लसीकरण हा उपाय आहे.nअनेक श्रीमंत देशात प्रौढ व मुले यांचे लसीकरण चालू आहे.nत्यांना नवीन विषाणू प्रकारांची लागण होण्याचा धोका लसीकरणामुळे कमी होत आहेnपण हेच देश गरीब देशांना मात्र लस द्यायला तयार नाहीत.nत्यामुळे तेथे धोका कायम आहे.nब्रिटनने मोठय़ा प्रमाणात लसीकरण केले असून त्यामुळे रुग्णांची संख्या कमी झाली आहे.nपण असे असले तरी डेल्टा विषाणूंचा प्रसार वाढत आहे.nहा विषाणू मूळ भारतातला आहे.nनेमके किती प्रमाणात लसीकरण गरजेचे आहे हे सांगता येणार नाही.nसर्वांचेच लसीकरण करणे हितावह आहेnपण निदान ८० टक्के लोकांचे तरी लसीकरण झाले पाहिजे.nत्यामुळे इतर देशांतून येणाऱ्या विषाणूंपासून निर्माण होणारा धोका कमी होईल,nअसे ते म्हणाले.nजागतिक आरोग्य संघटनेच्या तंत्रज्ञान प्रमुख मारिया व्हॅन खेरखोव यांनी सांगितले की, डेल्टा विषाणू साठ देशांत पसरला असून तो ब्रिटनमध्ये सापडलेल्या अल्फा विषाणूपेक्षा जास्त संसर्गजन्य आहे.nसामाजिक पातळीवर एकत्र येणे,nसार्वजनिक आरोग्य यंत्रणेतील शिथिलता,nलशीचे असमान वितरण या गोष्टी विषाणू्च्या प्रसारास कारण ठरत आहेत.