* कांदे महागले,n* पुढील महिन्यात आणखी दरवाढीची शक्यता……nnमुंबई : कांदा पिकाला वेळेआधी हजर झालेल्या पावसाचा फटका बसला असून कांद्यांची बाजारातील आवक घटल्याने त्याचे भाव वाढू लागले आहेत.nकिरकोळ बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा सध्या ३० ते ३५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे.nजुलैमध्ये हे दर अधिक वाढतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.nतौक्ते चक्रीवादळामुळे राज्यभर झालेल्या पावसाने कांद्याच्या पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.nअनेक शेतकऱ्यांचे तयार कांदे भिजले,nतर कुठे लागवडीवर परिमाण झाल्याने कांद्यांची अपेक्षित आवक होऊ शकली नाही.nत्यामुळे सध्या कांद्यांचे भाव वाढले आहेत.nघाऊक बाजारात प्रतिकिलोमागे ५ ते ७ रुपयांनी,nतर किरकोळ आजारात ८ ते १० रुपयांनी दरवाढ झाली आहे.nघाऊक बाजारपेठेत १२ ते १५ रुपये प्रतिकिलोने मिळणारा चांगला कांदा २० ते २५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे.nतर १४ ते १७ रुपये प्रतिकिलो अशा दराने कमी प्रतीचा कांदा उपलब्ध आहे.nघाऊक बाजारपेठेतील दर वाढल्याने किरकोळ बाजारातही कांद्याच्या दराने उसळी घेतली आहे.nगेल्या आठवडय़ात साधारण २० ते २२ रुपये प्रतिकिलोने मिळणारा चांगल्या प्रतीचा कांदा गुरुवारी ३० ते ३५ रुपये प्रतिकिलोने विकला जात होता.n‘आठ दिवसांपासून कांद्याचे दर चढायला सुरुवात झाली.nपावसाच्या माऱ्यामुळे उत्तम प्रतीचा सुका कांदा केवळ ३० टक्केच येतो आहे.nउर्वरित ७० टक्के कांदा कमी प्रतीचा आहे.nशेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान झाल्याने ही भाववाढ झाली आहे.nअनेक शेतकऱ्यांकडे तयार कांदे आहेत,nपण आताही पाऊस सुरू असल्याने त्याची साठवणूक करणे आव्हानात्मक होत आहे.nपरिणामी जुलै महिन्यात कांद्याचे भाव आणखी वाढतील,’nअसे वाशी ए.पी.एम.सी. बाजारातील कांदा व्यापारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.