Uncategorized

पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी फरार आरोपींविरोधात हाती घेतली विशेष मोहिम !

पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी फरार आरोपींविरोधात हाती घेतली विशेष मोहिम !

nइंदापुर ( प्रतिनिधी ) – पुणे ग्रामिण चे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी  रेकॉर्डवरील फरार असलेल्या आरोपींना पकडणेसाठी विशेष मोहिम हाती  घेतली असुन, आरोपींना पकडण्याच्या सुचणा स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या. दिनांक ४ जुन २०२१ रोजी पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेस मिळालेल्या माहितीवरून शिरूर पो.स्टे. गु.र.नं.६४५/२०१९ भादंवि कलम.३७६ प्रमाणे दाखल गुन्हयातील  २० महिन्यापासून फरार असलेला रेकॉर्डवरील  यादी क्र.१००४ मधील आरोपी अतुल वसंत गिरे वय २३ वर्षे रा.बेलवंडी फाटा, ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर यास टाकळीहाजी, निघोज रोड ता.शिरूर जि.पुणे येथून पथकाने ताब्यात घेतले.सदर आरोपीची वैदयकिय तपासणी करुन त्यास पुढील कारवाईसाठी शिरूर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले.nसदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी दरोडा, जबरी चोरी, चोरी व आर्म ॲक्ट प्रमाणे ४ गुन्हे दाखल आहेत.१) सुपा (अहमदनगर) पो.स्टे. गु.र.नं.१३४/२०१६ भादंवि क.३९५,२) सुपा(अहमदनगर) पो.स्टे. गु.र.नं.१८/२०१६ भादंवि क.३९४ ३) श्रीगोंदा (अहमदनगर) पो.स्टे. गु.र.नं.१९३/२०१९ भादंवि क.३८०,१८७ ४) मंचर पो.स्टे. गु.र.नं.३६१/२०१८ आर्म ॲक्ट क.३,२५nसदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट,सपोनि सचिन काळे,पोहवा. विद्याधर निचित, पोहवा. महेश गायकवाड,पोहवा. निलेश कदम,पोहवा. सचिन गायकवाड,पोहवा. सुभाष राऊत,पो.ना. गुरु गायकवाड,चालक पोहवा. काशिनाथ राजापुरेnयांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *