Uncategorized

शिवस्वराज्य दिनी धर्मादायसाठी मराठी अनिवार्य*

*शिवस्वराज्य दिनी धर्मादायसाठी मराठी अनिवार्य*

n

मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा. मात्र अनेक वेळा याचा विसर पडतो अथवा हेतुपुरस्सर पुरोगामित्व प्रदर्शित करायला इंग्रजीचा आधार घेतला जातो. मात्र मायबोली मराठीचा हुंकार आता महाराष्ट्र राज्याच्या धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे यांनीच भरला आहे.nनुकत्याच काढलेल्या परिपत्रक क्र ५८८ नुसार तरारे यांनी राज्यातील सर्व नोंदणीकृत ट्रस्ट व संस्थांनी आपले नामफलक मराठी भाषेत लिहून दर्शनी भागात लावण्याचे महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत.nमहाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या परिपत्रक क्र २०१९/प्र.क. ६६/ भाषा -२ नुसार धर्मादाय आयुक्तांनी हे निर्देश दिले आहेत.nतसेच मराठीतून नामफलक लावले जात आहेत यासाठी सर्व विभागीय सह धर्मादाय आयुक्तांनी आपल्या अधिनस्त उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांमार्फत याचा अनुपालन अहवाल द्यायचा आहे.n~~~~~~~~~~~~~~~~~~~nधर्मादाय न्यास हे समस्त जनतेसाठी असतात. त्यांची समग्र माहिती राज्यातील गरजू व्यक्तींना मराठीतून मिळावी यासाठी हे निर्देश उपयुक्त होतील. शिवस्वराज्य दिन शासकीय पातळीवर साजरा होत असताना मायबोलीतील नामफलक अनिवार्य करण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे.n*ॲड. शिवराज प्र. कदम जहागिरदार*nविश्वस्त, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *