शरद पवार यांच्या राज्यात 22 दिवसात 45 सभा !nn
nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnमहाविकास आघाडीच्या लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार या पक्षामार्फत राज्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी 22 दिवसात 45 सभाचे आयोजन केले आहे.nnराज्यातील दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला शरद पवार १८ एप्रिलपासून प्रारंभ करत आहेत. ११ मे • पर्यंत पवार यांच्या २२ दिवसांत ४५ सभांचे नियोजन केले आहे.nnबारामती या स्वतःच्या मतदारसंघात प्रचाराची सभा घेण्याचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी शरद पवार यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक अशा सहा सभांचे नियोजन करण्यात आले आहे.