ठाकरे सरकार पोलिसजीवी झालंय -nदेवेंद्र फडणवीसnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnकेंद्रीय मंत्री आणि भा.ज.पा. नेते नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे.nराज्यात तीन ठिकाणी राणेंवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.nदुसरीकडे भा.ज.पा. मात्र नारायण राणे यांची पाठराखण करताना दिसत आहे.nअनेक भा.ज.पा. नेत्यांनी राणेंच्या समर्थनार्थ मतं व्यक्त केली आहेत.nविरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.nत्यावेळी पोलिसांचा राज्यात गैरवापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.nयाबद्दल पत्रकारपरिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले,n“शर्जील उस्मानी राज्यात येतो आणि भारत मातेबद्दल बोलतो मात्र कारवाई होत नाही.nआता इथे पोलीस राणेंवर कारवाईसाठी निघाले आहेत.nपोलिसांचा गैरवापर चाललेला आहे.nसरकारने बस म्हटल्यावर काही लोक लोटांगण घालत आहेत.nकेवळ काही लोकांना खुश करण्याकरता हे करत असतील तर ते महाराष्ट्रसाठी योग्य नाही.”nफडणवीसांची पहिली प्रतिक्रिया ते पुढे म्हणाले, “ठाकरे सरकार पोलीस जीवी सरकार झालेलं आहे.nमाझा सल्ला आहे पोलिसांनी कायद्याने काम करावे.nकायद्याच्या भाषेत हा दखलपात्र नाही.nपण त्याला जबरदस्तीनं दखलपात्र गुन्हा करायचा प्रयत्न केला जातोय.nपोलिसांचा गैरवापर होतोय.nमहाराष्ट्र पोलिसांचं काम मला माहित आहे.nते निष्पक्ष आहेत.nपण आता त्या पोलिसदलाचा ऱ्हास होतोय”.