Uncategorized

रेडणीत ‘राजमाता अहिल्यादेवी होळकर’ 298 वा जयंती उत्सव साजरा !

रेडणीत ‘राजमाता अहिल्यादेवी होळकर’ 298 वा जयंती उत्सव साजरा ! nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnरेडणी गावात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती साजरी करण्यात आली.nnया जयंती दिवशी गजढोल, हलगी वादन, नृत्य या लोक परंपरा जोपसणारे कार्यक्रम घेण्यात आले.nnबीड येथील व्याख्याते व प्रबोधनकार ज्ञानदेव काशीद यांनी “होळकर शाही “या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यानातून उपस्थित जनसमुदाय समोर प्रबोधन केले.श्रुती वाघमोडे हिने मनोगत व्यक्त केले.nnया कार्यक्रमात राजमाता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन इंदापूर चे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले, या वेळी व्यासपीठावर इंदापूर पंचायत समिती चे माजी सभापती विलास वाघमोडे, धनगर आरक्षण कृती समिती चे सदस्य डाँ शशिकांत तरंगे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, माजी सदस्य श्रीमंत ढोले, तेज पृथ्वी ग्रुप च्या अध्यक्षा अनिता खरात, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, आदी मान्यवर उपस्थित होते.nnnnरेडणी गावात पाच टन भंडारा उधळन करीत राजामाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली.nnइंदापूर पोलीस स्टेशन अंकित बावडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व त्यांच्या सहकार्यांनी चोख आणि नियोजन बद्ध बंदोबस्त ठेवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *