Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

आमदार यशवंत माने यांचे हस्ते कृषि प्रदर्शनाचे उदघाटन…..इंदापूर कृषि महोत्सव आदर्श पत्रकार पुरस्काराने सुधाकर बोराटे यांचा सन्मान  

इंदापूर कृषि महोत्सव आदर्श पत्रकार पुरस्काराने सुधाकर बोराटे यांचा सन्मानn* आमदार यशवंत माने यांचे हस्ते कृषि प्रदर्शनाचे उदघाटनnnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnकृषि उत्पन्न बाजार समिती इंदापूर आयोजित इंदापूर कृषि महोत्सव २०२४ अंतर्गत दैनिक उजनी टाईम्स चे मुख्य संपादक सुधाकर बोराटे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी मोहळ विधानसभा आमदार यशवंतराव माने,छत्रपती सह.साखर कारखाण्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास माने, उपसभापती रोहीत मोहळकर, इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अप्पासाहेब जगदाळे, कर्मयोगी सहकारी साखर कारखाण्याचे उपाध्यक्ष भरत शहा,निरा भीमा कारखाण्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार,इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराज जाधव, बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, कर्मयोगीचे संचालक वसंतराव मोहळकर,छत्रपतीचे मा संचालक गणेश झगडे, विलासबापू वाघमोडे,कांतीलाल झगडे इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.nnnnआमदार यशवंत माने यांचे हस्ते बुधवारी दुपारी इंदापूर कृषि महोत्सव २०२४ उदघाटन सोहळा संपन्न झाला,तर राष्ट्रवादी पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांचे हस्ते घोडे बाजार शुभारंभ व निरा भीमा सह.साखर कारखाण्याचे चेअरमन लालासाहेब पवार यांचे हस्ते आॅलंपिक घोडे सवारी प्रात्यक्षीक शुभारंभ संपन्न झाला.याप्रसंगी घोडे स्वारांनी प्रात्यक्षीके करून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले,तर बुलेट शो च्या चित्तथरारक प्रात्यक्षीकांनी उपस्थितांची मने जिंकली.त्यानंतर सांस्कतिक कार्यक्रम व पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्तेदिप प्रज्वलन करून पारितोषिक वितरण समारंभात सुधाकर बोराटे यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी छत्रपती सह.सा.कारखाण्याचे माजी अध्यक्ष आविनाश घोलप होते.याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍यांचा इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.nnnnआमदार यशवंत माने म्हणाले की २०२० साली इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे तात्कालिन सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी इंदापूर कृषि महोत्सवास सुरूवात केली.आणि पुणे जिल्ह्यातील एकमेव इंदापूर या ठिकाणी घोडे बाजार भरविण्याचा मान इंदापूर बाजार समितीला मिळवुन दीला त्याबद्दल अप्पासाहेब जगदाळे यांचे अभिनंदन केले.अप्पासाहेबांनी काही दिवसापूर्वी सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रीत करून बाजार समितीची निवडणुक लढविली व लोकांनीही तुम्हाला चांगली साथ देत विजय मिळवून दिला.त्याचप्रमाणे आपण इंदापूर कृषि महोत्सवात सुद्धा राजकीय जोडे बाजूला सारून तालुक्यातील सर्व पक्षातील राजकीय,सामाजिक,शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांना एकत्रीत करून आज विचारपिठावर एकत्रीत आणले. इंदापूर तालुक्यात ही किमया फक्त अप्पासाहेब तुम्हीच शक्य करू शकता असे गौरवोदगार आमदार यशवंत माने यांनी कृषि महोत्सव उदघाटन कार्यक्रम प्रसंगी बोलताना काढले.nnnnइंदापूर तालुक्यातील सर्व राजकीय,सामाजिक,क्षेत्रातील लोकांना एकत्र आणण्याचे काम आम्ही करत असताना अशा गोष्टी सहजासहजी घडत नाहीत.तर लोकांचे आमच्यावर असलेल्या प्रेमापोटीच तालुक्यातील सर्व पक्षीय लोक एकाच विचार पाठावर उपस्थित झाल्याचे अप्पासाहेब जगदाळे म्हणाले.यावेळी ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला अशा सर्वांचे मनापासुन अभिनंदन केले.व उपस्थित सर्वांचे स्वागत अप्पासाहेब जगदाळे, इंदापूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास माने,उपसभापती रोहीत मोहळकर यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती दत्तात्रय फडतरे यांनी केले तर उपसभापती रोहीत मोहळकर आभार मानले.यावेळी संग्रामसिंह निंबाळकर,nमनोहर ढुके,संदिप पाटील, रूपाली वाबळे, मंगल झगडे, आबा देवकाते, तुषार जाधव, संतोष गायकवाड, अनिल बागल, दशरथ पोळ, रोनक बोरा,सुभाष दिवसे यांचेसह प्रभारी सचिव संतोष देवकर हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *