Uncategorized

फडतरे नाॅलेज सिटीत मिशन युवा स्वास्थ कोविड लसीकरण मोहीम संप्पन्न

फडतरे नाॅलेज सिटीत मिशन युवा स्वास्थ कोविड लसीकरण मोहीम संप्पन्नnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnशुक्रवार, दि. 7 : कळंब ( ता.इंदापूर ) येथील फडतरे नॉलेज सिटी अंतर्गत 15 ते 18 वयोगटातील बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्निकच्या व साहेबराव फडतरे ज्युनियर कॉलेज च्या विद्यार्थ्यांना मिशन युवा स्वास्थ कोविड लसीकरण मोहीम 2022 अंतर्गत लसीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव तथा इंदापूर मार्केट कमिटीचे सभापती दत्तात्रय (आबा) फडतरे तसेच इंदापूर पंचायत समितीच्या सदस्या शैलजा फडतरे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी सुधीर डोंबाळे सर ,कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राचे राक्षे, संदिप एकतपुरे व फडतरे नॉलेज सिटी अंतर्गत सर्व विभागांचे प्राचार्य उपस्थित होते.nसदरील उपक्रम संस्थेचे अध्यक्ष उत्तम ( दादा ) फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या संप्पन्न झाला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *