महिला पोलिसांना ८ तास ड्युटी;nग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांची माहितीnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपोलीस विभागात अनेकवेळा महिला कर्मचाऱ्याकडून ८ तासाची ड्युटी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती.nया मागणीचा विचार करत पोलीस महासंचालक यांच्या सूचनेनुसार पुणे ग्रामीण मधील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना ८ तासाच्या ड्युटीची अंमलबजावणी केली जाणार आहे.nअशी माहिती पुणे ग्रामीण अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली.nयावेळी अभिनव देशमुख म्हणाले की,nमहिला कर्मचारी यांना कुटुंबाची जबाबदारी सांभाळून ड्युटीवर यावे लागते.nआतापर्यंत १२ तासाची ड्युटी होती.nत्यामुळे महिलांसाठी ८ तासाची ड्युटी केली जावी,nअशी मागणी सतत होत होती.nअखेर याबाबत पोलीस महासंचालक यांच्या सूचनेनुसार पोलीस वेल्फेअरचा भाग म्हणून प्रायोगिक तत्त्वावर ८ तासाच्या ड्युटीची अंमलबजावणी होणार आहे.nयामुळे ३३० महिला कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.nतसेच ते पुढे म्हणाले की,nयेणार्या काळात या निर्णयाचा आढावा घेऊन,nआणखी कोणत्या विभागाला सामावून घेता येईल का?nयाबाबतचा निर्णय घेतला जाईल.nतसेच महिला कर्मचार्यांच्या ८ तासाच्या ड्युटीच्या निर्णयामुळे कामावर निश्चितच चांगला परिणाम होईल,nअसा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.