Uncategorized

शिष्यवृत्ती परीक्षेत वालचंदनगरच्या भारत चिल्ड्रेन्स अकॅडमीचा डंका

    n

  1. शिष्यवृत्ती परीक्षेत वालचंदनगरच्या भारत चिल्ड्रेन्स अकॅडमीचा डंका
  2. n

nसचिन तरंगेn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnभारत चिल्ड्रन्स अकॅडमी वालचंदनगर (ता. इंदापूर) या शाळेतील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याचा निकाल १६.९९ टक्के असताना शाळेचा निकाल ७३.३३ टक्के तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याचा निकाल ११.३९ टक्के असताना शाळेचा निकाल ३१.८२ टक्के लागला असल्याची माहिती, शाळेचे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर यांनी दिली.nnपाचवीतील अभिलाषा सोमनाथ शिंदे (७८%), ओजस आशिष केसकर (७४%), आर्या अमोल दळवी (७२.६६%)nnतर आठवीतील अप्रूपा अनिल पाटील (७१.८१%), वेदांकिता संतोष तरंगे (६१.०७%), रुचिता राहुल पानसे (६०.४०%),ईरा किशोर बनसोडे (६०.४०%) या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले असून गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.nnया यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन वालचंदनगर कंपनीचे सी ई ओ व कार्यकारी संचालक चिराग दोशी, शाळा समितीचे अध्यक्ष आशिष केसकर व प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *