Uncategorized

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयास बी.एस्सी, एम.एस्सी ,एम.ए नविन अभ्यासक्रमास मान्यता

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयास बी.एस्सी, एम.एस्सी ,एम.ए नविन अभ्यासक्रमास मान्यताnnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी बी.एस्सी कॉम्प्युटर सायन्स,एम.एस्सी अनलिटिकल केमिस्ट्री,एम.ए अर्थशास्त्रnनवीन अभ्यासक्रमास मान्यता मिळाली आहे. संस्थेचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाने नवीन अभ्यासक्रम मागणी प्रस्ताव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे दाखल केला होता.nnnnविद्यापीठ स्तरावरून महाविद्यालयीन प्रत्यक्ष तपासणी व प्रशासकीय अहवालानुसार महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव दाखल केल्यानंतर विश्वासराव रणसिंग महाविद्यालयास नवीन अभ्यासक्रमासाठी मान्यता मिळाली असल्याचे माहिती इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग यांनी दिली.महाविद्यालयास बी एस्सी कॉम्प्युटर सायन्स, एम एस्सी अनलिटिकल केमिस्ट्री, एम.ए अर्थशास्त्र या अभ्यासक्रमास मान्यता मिळाली असून ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा असे आव्हान संस्था सचिव वीरसिंह रणसिंग यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *