आधार कार्ड क्रमांक आणि नावनोंदणी आय.डी. हरवलाय?nकाळजी नको,n’या’ सोप्या स्टेप्स करा फॉलोnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnतुमचे आधार कार्ड हरवले आहे आणि आधार नावनोंदणी आय.डी. (E.I.D.) सुद्धा सापडत नाही?nकाळजी करू नका,nतुम्हाल खाली दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल.nतुम्हाला फक्त हेल्पलाईन क्रमांक ‘१९४७’ डायल करायचा आहेnकिंवा तुम्ही यू.आय.डी.ए.आय.न या वेबसाइटद्वारे आपला फोन नंबर वापरूनही हे करू शकता.nयू.आय.डी.ए.आय.चे ट्विट “आधार हरवला आणि नावनोंदणी स्लिप देखील हरवली?nकाळजी करू नका.nआमच्या हेल्पलाईन १९७४ वर फोन करून तुम्ही तुमचा ई.आय.डी.n(नावनोंदणी आय.डी.) मिळवू शकता. तुम्ही तुमचा ई.आय.डी. किंवा यू.आय.डी.n(आधार) ऑनलाइन देखील मिळवू शकता,n”यू.आय.डी.ए.आय.ने एका ट्विटमध्ये म्हटले आहे.nजर तुम्ही यू.आय.डी.ए.आय.n(U.I.D.A.I.) वेबसाइटला भेट देऊन तुमचा नंबर मिळवणार असाल तर हरवलेल्या आधारnU.I.D./E.I.D. पुनर्प्राप्तीसाठी विनंती सबमिट करा.nतुमचे आधार फोन नंबरशी लिंक करणे महत्त्वाचे का आहे ?nयाचे आणखी एक कारण म्हणजे यामुळे तुम्हाला सर्व संबंधित सेवा ऑनलाइन शोधण्यात मदत होते.nn*या स्टेप्स करा फॉलो*nnस्टेप.१) : U.I.D.A.I. च्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा.nस्टेप २) : मुख्यपृष्ठावर, ‘ रिट्रीव्ह लॉस्ट यू.आय.डी./ई.आय.डी. ‘ या पर्यायावर क्लिक करा.nएक नवीन पेज उघडेल.nस्टेप ३) : तुम्हाला दोन पर्याय दिसतील: रिट्रीव्ह आधार क्रमांक (U.I.D.) किंवा रिट्रीव्ह आधार नोंदणी क्रमांक (E.I.D.). एका पर्यायावर क्लिक करा.nस्टेप ४) : नाव, ई मेल आय.डी., मोबाईल नंबर सारखे विचारलेले सर्व तपशील भरा.nस्टेप ५): मोबाईलवर आपला आधार क्रमांक प्राप्त करण्यासाठी पेजच्या डाव्या बाजूलाn‘आधार क्रमांक’ हा पर्याय निवडा.nस्टेप ६) : पडताळणीसाठी कॅप्चा भरा.nस्टेप ७) : ओ.टी.पी. पाठवा पर्यायावर क्लिक करा.nस्टेप ८) : O.T.P. भरा.nस्टेप ९) : तुमचा आधार क्रमांक किंवा नावनोंदणी आय.डी. तुमच्या फोन नंबरवर पाठवला जाईल.