परिवहन मंत्र्यांचा महामंडळातला सचिन वाझे कोण? ;nगोपीचंद पडळकरांचा संतप्त सवालnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnमोठ्या विश्वासानं महाराष्ट्रातला प्रवासी आजही एस.टी.ने प्रवास करतो.nपण आपल्या त्यागाने व सेवेने एस.टी. महामंडळला मोठं करणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यांवरच आत्महत्येची वेळ यावी,nही राग आणि अपमान वाटणारी बाब आहे,nअशी टीका भा.ज.पा. नेते व आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.nएकतर तुटपुंजा पगार, त्याचाही वेळेवर पत्ता नाही.nठाकरे सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष उलटत आली पण कर्मचाऱ्यांचे वेतन करार अजून झाले नाहीत.nमहामंडळाला आवश्यकता नसणाऱ्या गोष्टीसाठी हजारो कोटीचे टेंडर काढ़ून खाजगी कंत्राटदारांची संपूर्ण देणी दिली जातात.nपण कर्मचाऱ्यांचे मूलभूत पगार दिले जात नाहीत.nnहे सर्व कुणाच्या टक्केवारीसाठी चाललंय?nपरिवहन मंत्र्यांचा महामंडळातला सचिन वाझे कोण ?nअसा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला.nया सर्व विरोधात ज्या युनियनने आवाज उठवायला पाहिजे तेच आज प्रस्थापितांच्या तालावर नाचत आहेत.nपण माझं सर्व एस.टी. कर्मचाऱ्यांना आव्हान आहे की आपण कुठल्याही दबावाला न झुकता आपल्या हक्कासाठी लढा उभारा.nमी तुमच्या पाठीशी खंबरीपणे उभा आहे.nराज्य सरकारकडं मागणं आहे की जे राज्य कर्मचाऱ्यांना तेच एस.टी. कामगारांना द्या,nअन्यथा संघर्ष अटळ आहे,nअसंही ते म्हणाले आहेत.nया लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या २१ सप्टेंबरला झरे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.nआपण तिथे जास्त संख्येनं यावे असे आवाहनही त्यांनी केले.