Uncategorized

लहान मुलांसाठीची करोना लस कधी येणार? अदर पूनावालांनी केली मोठी घोषणा!

लहान मुलांसाठीची करोना लस कधी येणार?nअदर पूनावालांनी केली मोठी घोषणा!nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १७ सप्टेंबर देशभरात सुमारे अडीच कोटी लसीचे डोस देण्यात आले.nया पार्श्वभूमीवर सर्वच स्तरातून कौतुक होत असताना दुसरीकडे लहान मुलांसाठी अद्याप लस आलेली नाही.nत्यामुळे १८ च्या खालच्या वयोगटातील मुला-मुलींसाठी अजूनही लसीची प्रतीक्षाच आहे.nया पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्युटचे सी.ई.ओ. अदर पूनावाला यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.nसिरम इन्स्टिट्युटच्या हडपसरमधील प्लांटमध्येच कोविशिल्ड लसींची उत्पादन सुरू आहे.n१८पेक्षा वरच्या सर्वांना ही लस दिली जात असून आता १८ वर्षांखालील वयोगटाच्या लोकसंख्येला देखील लस मिळण्याची प्रतीक्षा लागलेली आहे.nएका पत्रकार परिषदेमध्ये अदर पूनावाला यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे.n“लहान मुलांसाठी सिरमच्या कोवावॅक्स लसीच्या चाचण्या अगदी सुरळीतपणे सुरू आहेत.nजर सर्व चाचण्या आणि प्रक्रिया व्यवस्थित पार पडली,nतर पुढील वर्षाच्या सुरुवातीला अर्थात जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये लहान मुलांसाठी लस येईल”,nअसं अदर पूनावाला म्हणाले आहेत.n“अनेक स्वयंसेवकांना तपासण्यांसाठी लसीचे डोस देण्यात आले आहेत.nचाचण्या व्यवस्थित सुरू आहेत.nया वर्षाखेरीसपर्यंत या चाचण्यांचा आढावा घेतला जाईल”,nअसं देखील पूनावाला म्हणाले.nn*लस किती सुरक्षित?*nnदरम्यान, चाचण्यांच्या प्रक्रियेविषयी माहिती देताना अदर पूनावाला म्हणाले,n“ही लस लहान मुलांसाठी किती सुरक्षित आहे हे तपासण्यासाठी आम्हाला किमान ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागेल.nआम्ही टप्प्याटप्प्याने यावर काम करत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *