“चला मतदार होवू या,nलोकशाही प्रबळ करु या” – संजय खरातnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnकळंब ( ता.इंदापूर ) दि.९ आॕगस्ट २०२१ पासून ते ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू झाला आहे.तरी १ जानेवारी२०२२* पर्यंत वय वर्षे १८ पूर्ण होणाऱ्या नवीन मतदारांनी खालील कागदपत्रांसह मतदान केंद्रस्तरिय अधिकारी *[B L O]* यांच्याकडे संपर्क साधावा.nn*नवीन मतदार नोंदणीसाठी कागदपत्रे*nn*घरातील मुलगा/मुलगी यांच्या नाव नोंदणीसाठी कागदपत्रे*n१)जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेटn२)रहिवासी बाबत स्वयंघोषणा दाखला स्वत:च्या सहीचाn३)आधार कार्ड झेरॉक्सn४) २ पासपोर्ट साईज फोटोn५)घरातील नात्यातील(आई, वडील, भाऊ, बहीण)यांपैकी एकाचे ज्यांचे नाव अगोदर मतदार यादीत समाविष्ठ असेल तर त्यांच्या मतदान ओळखपत्राची झेरॉक्सnn*घरातील सुनबाईचे नाव समाविष्ट करण्यासाठी कागदपत्रे*nn१)जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड सर्टिफिकेटn२)रहिवासी बाबत स्वयंघोषणा दाखला स्वत:च्या सहीचाn३)२ पासपोर्ट साईज फोटोn४)माहेरच्या गावात मतदार यादीत नाव असेल तर ते नाव कमी केल्याचा दाखला.n५)माहेरच्या गावात मतदार यादीत नाव नसेल तर यादीत नाव नसल्याचा दाखलाn६)पतीचे मतदार ओळखपत्र झेरॉक्सn७)लग्नपत्रिका किंवा विवाह नोंदणी दाखलाnगावातील वार्डनुसार बीएलओ यांचेकडे दि.30/09/2021 पर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन खरात यांनी केले.nn*टीप*–१ जानेवारी २०२२ ला आपले वय १८ वर्ष पाहिजे असे सर्व स्त्री व पुरुष मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्रnमतदारांनी आपली नावे नोंदवून घ्यावीत.