Uncategorized

राजकारणातून समाजकारण करावे. आ. निलेश लंके

राजकारणातून समाजकारण करावे. आ. निलेश लंकेnश्रीकृष्ण सातव (फलटण तालुका प्रतिनिधी)nnराजकारणाकडे राजकारण म्हणून न पाहता समाजकारण म्हणून पाहिले पाहिजे. राजकारण करताना मात्र समाजकारण सुरु ठेवावे अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. निलेश लंके यांनी व्यक्त केली.nवाठार निंबाळकर ता. फलटण येथे दिगंबर आगवणे यांनी आयुर हाँस्पिटलच्या माध्यमातून २०० बेडचे कोविड सेंटर सुरु केले असून आ. निलेश लंके यांचे हस्ते फीत कापून शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, प्रल्हादराव साळुंखे , दिगंबर आगवणे पंचायत समिती सदस्या सौ. जयश्री आगवणे ,डॉक्टर्स, नर्सेस कर्मचारी उपस्थित होते.आयुर हाँस्पिटलने रुग्णांची ने आण करणेसाठी सुसज्ज अशी रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली असून या रुग्णवाहिकेचा शुभारंभ आ. निलेश लंके यांनी श्रीफळ वाढवून व स्वतः रुग्णवाहिका चालवून केला.nआयुर हाँस्पिटलच्या माध्यमातून ६०० रुग्णांना डिसचार्ज दिला हे ऐकून समाधान वाटले. दिगंबर आगवणे यांनी तिसरी लाटेचा सामना करण्यासाठी आज २०० बेडचे कोविड सेंटर सुरु केले असून ८०० बेडची तयारी करीत आहेत असे एकूण १ हजार बेडचे कोविड सेंटर सुरु होत असल्याचे सांगून भविष्यकाळात मदतीचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. युवा नेते दिगंबर आगवणे हे समाजाला आधार देणेचे काम करीत असून रुग्णांना वेळेत उपचार व्हावेत यासाठी त्यांची तळमळ दिसून येत असल्याचे आ. निलेश लंके यांनी सांगितले. पारनेर जि. अहमदनगर येथील निलेश लंके यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर १ हजार बेडचे मोफत सर्व सुविधांनी युक्त असे वाटते कोविड सेंटर सुरु असल्याची प्रेरणा घेवून व आगामी येणारी कोरोना विषाणूची तिसरी लाट याचा सामना करण्यासाठी सामाजिक बांधिलकीने २०० बेडचे कोविड सेंटर सुरु केले असून ८०० बेडची तयारी सुरु असल्याचे युवा नेते दिगंबर आगवणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *