मोहिते -पाटील -शिवतारे -बानगुडे पाटील एकाच व्यासपीठावर!

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
महाराष्ट्राच्या राजकारणातील मातब्बर राजकीय नेते म्हणून वं राज्याच्या राजकारणात माजी उप- मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे हे दिग्गज नेते 13 फेब्रुवारी 2023 रोजी एकाच व्यासपीठावर येत आहेत.
शिवज्योत मित्र मंडळाने “शिव जयंती “महोत्सव वा निमित्त ‘महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ‘व्याख्यान वं प्रतिमा पूजन वं भव्य मिरवणूक, झाँज ढोल प्रात्यक्षिक चा कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रम स विशेष निमंत्रीत पाहुणे वं शिव चरित्र व्याख्याते म्हणून ‘प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांचे व्याख्यान होणार आहे.
हा शिव जन्मोत्सव चा कार्यक्रम सर्वोत्तम होण्यासाठी शिव ज्योत मित्र मंडळ चे पदाधिकारी वं रेडणी ग्रामपंचायत चे सरपंच श्रीमती मीराबाई खाडे, उप सरपंच प्रफुल्ल चव्हाण, सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि भारतीय जनता पक्षाचे युवा नेते अमरदीप काळकुटे प्रयत्न करीत आहेत.
