Thu. Apr 16th, 2026

विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब-वालचंद वालचंद नगर राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित राखी फोर् नेशन उपक्रम संपन्न

img 20250806 wa0138
img 20250806 wa0138
Spread the love

विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब-वालचंद वालचंद नगर राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित राखी फोर् नेशन उपक्रम संपन्न

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब-वालचंद नगर व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने राखी फोर नेशन्स या उपक्रमाचे दिनांक 06/08/2025 रोजी सकाळी9.00 वाजता आयोजन संस्थेचे सचिव माननीय वीरसिंह रणसिंग (भैय्या) व महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सुरुवातीला प्रा. बनसोडे मॅडम यांनी सर्वांचे स्वागत केले व महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य माननीय डॉ. अशोक काळंगे सर व उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीक सर यांना फुलांचा बुके देऊन स्वागत राष्ट्रीय सेवा योजना चे प्रमुख माननीय प्रा.राजेंद्र कुमार डांगे यांनी केले.
त्यानंतर प्रा. डॉ. अमित शेटे यांनी राखी फोर नेशन या उपक्रमांतर्गत कॉलेजमधील विविध विद्यार्थ्यांकडून आपल्या सीमेवरील सैनिकांविषयी आपले असणारे मनोगत आपल्या शब्दात व्यक्त करणे, त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव, त्यांचे आपल्या जीवनातील असणारे महत्त्व, ते बजावत असलेली सेवा याविषयी आपल्या भावना व्यक्त करणे, असे आवाहन राष्ट्रीय सेवा योजना मार्फत करण्यात आले व त्याला विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला. त्यांनी व्यक्त केलेले विविध मनोगते व जवानांसाठी पाठवण्यात येणाऱ्या Hand made राख्या याचे भित्तिपत्रकाद्वारे उद्घाटन आपण प्राचार्यांच्या हस्ते करत आहोत असे सांगितले.

img 20250806 wa0140
img 20250806 wa0140

सदर कार्यक्रमाचे प्राचार्यांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी IQAC प्रमुख डॉ. प्रशांत शिंदे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. सुहास बहिरट सर व महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख,राष्ट्रीय सेवा योजना चे सदस्य डॉ. अमर वाघमोडे, प्रा. रुपनवर प्रा. पवार प्रा.माळवे प्रा. मिटकरी मॅडम प्रा. बनसोडे मॅडम, प्राध्यापिकेतर कर्मचारी, बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!