शिव-कल्याण संस्था समुहाचा रौप्यमहोत्सव साजरा

कळंब (ता. इंदापूर) येथील ‘शिव-कल्याण’ संस्था समूहाचा रौप्यमहोत्सव समारंभ गुरुवार, दि.18 सप्टेंबर 2025 रोजी दु. 4 ते 8.30 पर्यंत ‘सुशिलमधुबन’ निवासस्थानी राजेशाही दिमाखात साजरा करण्यात आला. गुरुवार, दि.18 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9 वा. शिव-कल्याण वाचनालय नवीन कार्यालयाचा मा. हनुमंतराव राऊत व स्वाती प्रभुणे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर शिव-कल्याण ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेचे नवीन कार्यालयाचे स्थलांतर मा.सुयश बोराटे, शिवानी भोसले व कल्याणी भोसले/बोराटे यांच्या हस्ते संपन्न झाले. यानंतर कळंब चौकात साप्ताहिक शिव-कल्याण व न्युज पोर्टल या कार्यालयाचे उद्घाटन मा. दिलीप चव्हाण, अमेय चव्हाण, तुकाराम बर्गे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यानंतर दु.12 वा. कै.अनिल/ प्रतापसिंह मधुकर भोसले यांचे द्वितीय पुण्यस्मरण साजरे करण्यात आले. या समयी भोसले परिवार व आप्तेष्ट उपस्थित होते.
दु. 4 ते 8.30 वा. पर्यंत शिव-कल्याण संस्था समुहाचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला. यासमयी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा. सौ. सुप्रियाताई सुळे, महाराष्ट्र राज्याचे मा. संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील साहेब तसेच विद्यमान कृषिमंत्री दत्तामामा भरणे, इंदापूर पंचायत समितीचे मा. सभापती प्रदीप पाटील, मा. पंचायत समिती सदस्य सुहास डोंबाळे, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती दत्तात्रय फडतरे, इंदापूर ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, रतिकलाल चौधर साहेब आदींसह पंचक्रोशीतील मान्यवर व ग्रामस्थांनी शिव-कल्याण संस्था समुहाचे संस्थापक अध्यक्ष शहाजीराजे भोसले यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कळंब व परिसरातील ग्रामस्थ, आप्तेष्ट व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

