Thu. Apr 16th, 2026

सराटीच्या जिजामाता महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर लाखेवाडीत संपन्न !

Spread the love

सराटीच्या जिजामाता महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर लाखेवाडीत संपन्न !

img 20260117 070521

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ “जिजामाता महाविद्यालय सराटी” अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना “शाश्वत विकासासाठी युवक पाणलोट आणि पडीक जमीन व्यवस्थापन “विशेष श्रमसंस्कार शिबीर संस्था अध्यक्ष आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली 09/01/2026 ते 15/01/2026 या कालावधीत लाखेवाडी या गावात पार पडले. यावेळी उत्कृष्ट स्वयंसेवक व स्वयंसेविका यांचा सन्मान करण्यात आला. या शिबिराचा समारोप करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक माननीय श्री मच्छिंद्र वीर सर उपस्थित होते. त्यांनी आपले मनोगतात विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाची कौतुक केले व त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच लाखेवाडी गावचे ग्रामस्थ किशोर काटकर उपस्थित होते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सीआयडी ऑफिसर बाळासाहेब माने हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रतिक्षा चव्हाण मॅडम यांनी केले. त्यांनी या शिबिर काळात केलेल्या कामाची सर्व माहिती उपस्थित मान्यवरांना सांगितली. या शिबिर काळात लाखेवाडी या गावची स्वच्छता करण्यात आली तसेच लाखेवाडी गावातील जय भवानी माता मंदिर व तुकाई मंदिर सर्व परिसर स्वच्छ करून वृक्षारोपण करण्यात आले . आणि मानेमळा येथील शिवाजी चौक व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी देखील स्वच्छता करण्यात आली.तसेच ग्राम सर्वेक्षण करून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. आरोग्य व रक्तदान शिबिर पथनाट्यातून या शिबिराची जनजागृती करण्यात आली .व रक्तदान शिबिरासाठी रॅली काढून तसेच घरोघरी जाऊन रक्तदात्यास माहिती देऊन रक्तदान करण्यास त्यांना प्रोत्साहित केले. शिबिराच्या सहाव्यादिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यासाठी देखील ग्रामस्थांनी छोट्या चिमुकल्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. तसेच त्यावेळी तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम देखील घेण्यात आला. त्याचबरोबर विविध प्रकारची व्याख्याने करून तसेच विद्यार्थ्यांना ज्यांनी उत्कृष्टरित्या राहण्याची सोय केली ते लाखेवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य तसेच लवकुश मंगल कार्यालयाचे मालक श्री काशिनाथ जी अनपट साहेब यांनी विद्यार्थ्यांना एनएसएस काय आहे याबद्दल मार्गदर्शन केले.यामुळे या विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी याचा फायदा होईल असे त्यांनी सांगितले. त्यांनी आपल्या मनोगतात स्वयंसेवक व स्वयंसेविकांनी शिबिर काळात केलेल्या कामाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे आभार सायन्स विभाग प्रमुख प्रा.गेंड सर यांनी मानले. व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैष्णवी देशमाने मॅडम व प्रा. मयुरी नलवडे मॅडम यांनी केले.

Related Post

error: Content is protected !!