छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन

( शिव-ल्याण न्युज नेटवर्क )
दिनांक 7/3/2026रोजी काटी मंडल मध्ये शेटफळ हवेली येथे काळ भैरवनाथ मंदिर येथे व दिनांक 14/3/2026 रोजी लाखेवाडी मंडल मध्ये लाखेवाडी या ठिकाणी आयोजित केले असून त्यामध्ये खालील प्रमाणे लाभ दिले जाणार आहेत.
1)सातबारावरील अ पा क शेरा कमी करणे
2)सातबारावरील ए कुम्या शेरा कमी करणे
3)सातबारा चे इतर हक्कातील बंडिंग व तगाई शेरे कमी करणे
4)सातबारा चे इतर हक्कातील कु का नवीन शर्त शेरा कमी करणे साठी अर्ज घेणे
5)चुकलेले सातबारा दुरुस्ती साठी अर्ज घेने
6)राष्ट्रीय अर्थ सहाय्य योजना अर्ज घेणे
7)EWS राहिशी दाखले जातीचे व उत्पन्नाचे दाखले
8)आधार कार्ड
9)सातबारा आठ अ फेरफार उतारे देणे.
या प्रमाणे कामे केली जाणार असल्यामुळे त्याचा ग्रामस्थान्नी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, अशी माहिती लाखेवाडी मंडल अधिकारी सतीश गायकवाड यांनी दिली.
