कळंब येथे फडतरे नाॅलेज सिटीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

सोमवार, दि.23 मार्च 2026 रोजी कळंब,वा.नगर येथे फडतरे पब्लिक ट्रस्ट च्या माध्यमातून व जय फडतरे युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.या आरोग्य शिबिराचे उदघाटन इंदापूर पंचायत समिती सभापती श्री.हर्षवर्धन लोंढे व उपसभापती श्री.जयकुमार कारंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषद सदस्य सौ.निर्मलाताई मिसाळ,पंचायत समिती सदस्य श्रीराज भरणे ,पंचायत समिती सदस्या डॉ.सौ.अनिता सोनवणे,राष्ट्रवादी काँग्रेस नेते सागरबाबा मिसाळ,मा.सभापती डॉ.नंदकुमार सोनवणे तसेच संस्थेचे अध्यक्ष उत्तम फडतरे ,सचिव.दत्तात्रय फडतरे,मा.पंचायत समिती सदस्या डॉ.सौ.शैलजा फडतरे,सौ.कल्याणी फडतरे, जय फडतरे ,अशोक आबा जाधव, सुभाष आप्पा जाधव, राहुल अर्जुन, अमोल चव्हाण, ज्ञानेश्वर खंडागळे,अभिजित खंडागळे, श्रीकांत वाघमारे, संतोष कदम,धनंजय वरुडकर, विजय महाडिक, दीपक चव्हाण, दादा जगदाळे, पांडुरंग जगदाळे, बाळकृष्ण जाधव , बंडू सावंत, तावरे सर, सुधाकर जमदाडे, बबलू पवार, राहुल रणमोडे, किशोर हगवणे, पिनू रणमोडे उपस्थित होते . या शिबिरात पुणे येथील रुबी हॉस्पिटल चे डॉ.संदीप मुनोत, डॉ.मंगेश काळे, डॉ.सुशील व त्यांचे एकूण 20 कर्मचारी उपस्थित होते, त्यांनी ECG,हृदय तपासणी,बी पी व शुगर तपासणी करून पेंशन्टला मोफत मार्गदर्शन केले.
तपासणी झालेल्या रुग्णांना अल्प दरात पुढील सुविधा देण्याचे त्यांनी सांगितले हृदयरोग तपासणीसाठी 185 रुग्ण उपस्थित होते.बारामारी येथील श्री जगन्नाथ हॉस्पिटल चे डॉ.किशोर रुपनवर हे स्वतःउपस्थित राहून रुग्णांना मनका,हाडांचे आजार,कंबर,गुढघा या आजारांवर त्यांनी मोफत सेवा देऊन पुढील उपचार कमी खर्चात करू असे सांगितले.यावेळी हाडांच्या आजाराचे 132 रुग्ण स्वतः डॉ किशोर रुपनवर यांनी तपासले .डोळ्यांच्या रुग्णांची तपासणी व उपचार लायन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटल,फलटण यांच्या टीम ने चांगले काम केले डॉ.प्रांजळ वाळंज व सहकारी पांडुरंग पाटणकर,गुरुनाथ पाटणकर,ह्यशिकेष माने यांनी योग्य ती तपासणी करून रुग्णांना मोफत चष्मे वाटप केले, व सवलतीच्या दरात ऑपरेशन करू असे त्यांनी सांगितले. एकूण 162 रुग्णांची त्यांनी तपासणी केली. हा देखणा असा सोहळा पार पाडण्यासाठी आयटीआय प्राचार्य गणेश चव्हाण सर, बाळू कदम व लक्ष्मीबाई फडतरे नर्सिंग कॉलेज स्टाफ तसेच इतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली .
पुढील महिन्यात अनेकांच्या मागणीवरून कॅन्सर व दातांचे शिबीर देखील आपण चांगले आयोजित करू असे मा.उत्तमदादा फडतरे व दत्तात्रय आबा फडतरे यांनी सांगितले.
