Fri. Apr 17th, 2026

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेत वालचंदनगरच्या भारत चिल्ड्रेन्स अकॅडमीचे यश

Spread the love

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेत वालचंदनगरच्या भारत चिल्ड्रेन्स अकॅडमीचे यश

screenshot 20241018 153209 whatsapp
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )  प्रदिप तरंगे : 

वालचंदनगर, दि.१८, इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील भारत चिल्ड्रन्स अॅकॅडमी व ज्युनियर कॉलेज शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात दुसरा व इंदापूर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राबवण्यात आले. यामध्ये दुसरा क्र. मिळालेल्या वालचंदनगर येथील भारत चिल्ड्रन्स अकॅडमी या शाळेला १३७ गुण मिळाले तर प्रथम क्रमांक मिळवलेल्या भोर तालुक्यातील राजा रघुनाथ विद्यालयास १३७.५ गुण मिळाले. भारत चिल्ड्रन्स अकॅडमी चा प्रथम क्रमांक अवघ्या अर्ध्या गुणाने हुकला.

शाळेने इंदापूर तालुक्याचा नावलौकिक उंचावला असून नेहमीच कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या शाळेचे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर व त्यांच्या सहकाऱ्यांचे गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात, वालचंदनगर कंपनीचे एम. डी. व सीईओ चिराग दोशी, मनुष्यबळ विभाग प्रमुख शंतनु घोषाल, सी एफ ओ संदीप जैन, व्हाईस प्रेसिडेंट धीरज केसकर,पंकज पवार, पवन अवधानी यांनी अभिनंदन केले.

Related Post

error: Content is protected !!