Thu. Apr 16th, 2026

यशराज आप्पा हेगडे व सिद्धेश नंदकुमार मिसाळ  ‘प्रतिभा’ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे विजेते …

Spread the love

यशराज आप्पा हेगडे व सिद्धेश नंदकुमार मिसाळ  ‘प्रतिभा’ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे विजेते …

img 20251216 082144

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागाने मा. शरदचंद्रजी पवारसाहेब व सौ. प्रतिभाकाकी पवार यांच्या वादिवसानिमित्त १२ व १३ डिसेंबर २०२५ रोजी ‘प्रतिभा’ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या वक्तृत्व स्पर्धेचे हे २४ वे वर्ष होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. शामराव घाडगे, उपप्राचार्य प्रो. डॉ. लालासाहेब काशीद, उपप्राचार्य प्रा. अंकुश खोत यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले.
कनिष्ठ विभाग
१. अस्मानीसुलतानी संकटात भरडलेला शेतकरी
२. कृत्रिम बुद्धिमत्ता व भारताची कृषिप्रधानता
३. संतांनी महाराष्ट्राला दिलेली जीवनमूल्ये
४. राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व – शरदचंद्रजी पवार
५. गाथा – ‘वंदे मातरम्’ची …
वरिष्ठ विभाग
१. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – आव्हाने व उपाय
२. नारायण सुर्वे – भाकरीचा चंद्र शोधणारा कवी
३. कृत्रिम बुद्धिमत्तेने घडविलेली कृषिक्रांती
४. त्रिभाषाविषयक धोरणाचे राजकारण
५. शरदचंद्रजी पवार – एक संघर्षयोद्धा
या विषयांवर ‘प्रतिभा’ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
वरिष्ठ विभागासाठी ११००० रु., ७००० रु., ३०००रु., १००० रु. ; कनिष्ठ विभागासाठी १०००० रु., ५००० रु., २००० रु., १००० रु. अशी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सांघिक विजेत्या संघांना ‘प्रतिभा’ करंडक देऊन प्राचार्य प्रो. डॉ. तानाजी मगर व बारामतीचे उपविभागीय अधिकारी श्री. वैभव नावडकर यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातून एकूण ३९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

कनिष्ठ विभागातील विजेते –
प्रथम – यशराज आप्पा हेगडे (राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व शरदचंद्रजी पवार), यशवंतराव चव्हाण इंस्टीटयूट ऑफ सायन्स, सातारा
द्वितीय – अथर्व उल्हास शेलार (अस्मानीसुलतानी संकटात भरडलेला शेतकरी), श्री. शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर
तृतीय –पृथ्वीराज मारुती जाधव (अस्मानीसुलतानी संकटात भरडलेला शेतकरी), न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेज, भाळवणी
उत्तेजनार्थ – अमृता बळीराम शिंदे (अस्मानीसुलतानी संकटात भरडलेला शेतकरी), विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती
सांघिक विजेतेपद –
अमृता बळीराम शिंदे (अस्मानीसुलतानी संकटात भरडलेला शेतकरी) व गायत्री सुनील मुर्गे (गाथा – ‘वंदे मातरम्’ची …), विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती
वरिष्ठ विभागातील विजेते –
प्रथम – सिद्धेश नंदकुमार मिसाळ (नारायण सुर्वे – भाकरीचा चंद्र शोधणारा कवी), दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज, इचलकरंजी
द्वितीय – सुमित सुशेन पाटील (शरदचंद्रजी पवार – एक संघर्षयोद्धा), विद्या प्रतिष्ठानचे ॲग्री बायोटेक महाविद्यालय, बारामती
तृतीय – प्रसाद संतोष परळे (शरदचंद्रजी पवार – एक संघर्षयोद्धा), यशोदा टेक्नीकल कॅम्पस, सातारा
उत्तेजनार्थ – अभय कृष्णकांत आळशी (त्रिभाषाविषयक धोरणाचे राजकारण), मुंबई विद्यापीठ, मुंबई
सांघिक विजेतेपद –
अहिल्या गणेश खताळ (त्रिभाषाविषयक धोरणाचे राजकारण) व लहू बाळू भोंग (कृत्रिम बुद्धिमत्तेने घडविलेली कृषिक्रांती), विद्या प्रतिष्ठानचे वसंतराव पवार लॉ कॉलेज, बारामती
या स्पर्धेच्या कनिष्ठ विभागाचे परीक्षण प्रा. डॉ. शिवाजी दळवी (करमाळा), आजिनाथ घोरपडे (बारामती), प्रा. शिवाजी कांबळे (बारामती) व वरिष्ठ विभागाचे परीक्षण डॉ. प्रशांत चवरे (भिगवण), सौ. संगीता हनुमंत भापकर (तरडोली), डॉ. सोनाली काटकर (बारामती) यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य प्रा. अंकुश खोत, उपप्राचार्य प्रो. डॉ. शामराव घाडगे, उपप्राचार्य प्रो. डॉ. लालासाहेब काशीद, IQAC Coordinator प्रा. नीलिमा पेंढारकर, मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंदा गांगुर्डे, कार्याध्यक्ष प्रा. नंदकुमार खळदकर, संयोजन समितीचे सदस्य डॉ. श्रीराम गडकर, प्रो. डॉ. अमर भोसले, प्रा. सुनील डिसले, प्रा. शिवाजी टकले, प्रा. कल्पना खाडे, प्रा. प्रताप मोहिते, प्रा. संभाजी कांगुणे, प्रा. बाबासाहेब खेडकर, प्रा. संजय आरण्ये, प्रा. श्रीकांत डगळे, प्रा. कल्पना उदगीरकर, प्रा. दादा मगर, प्रा. तुषार जगताप; प्रबंधक श्री. विजय रसाळ, कार्यालय अधीक्षक श्री. सदानंद पवार, श्री. राजेंद्र सरोदे, श्री. नितीन सावंत, श्री. सारंग दीक्षित, श्री. विश्वास बाबर, श्री. नंदकुमार शितोळे, श्री. दत्तू गोसावी, श्री. सुनील भोसले, श्री. सोमनाथ चव्हाण यांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

शुक्रवार, दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना भिगवण येथील कला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. तानाजी मगर आपल्या भाषणात म्हणाले की, “मा. शरदचंद्रजी पवार, विद्या प्रतिष्ठान या संस्थेशी माझे हे सलोख्याचे, आनंददायी संबंध आहेत. मा. साहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल व विद्या प्रतिष्ठान बद्दल मला कायमच आकर्षण आहे. ‘प्रतिभा’ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा नावलौकिक सर्वत्र आहे. यात सहभागी होणारे स्पर्धक ही उत्तम वक्तृत्व सादर करतात. या स्पर्धेतून नक्कीच उद्याचे वक्ते घडतील असा मला विश्वास आहे. संयोजन समिती ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जे परिश्रम घेत आहेत ते कौतुकास्पद आहेत.”

तसेच शनिवार, दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना बारामतीचे उपविभागीय अधिकारी श्री. वैभव नावडकर आपल्या भाषणात म्हणाले की, “AI चा वापर कृषी क्षेत्रात प्रगती करण्यासाठी नक्कीच करता येईल. त्याचे तंत्रज्ञान अवगत करायला हवे. AI हे कितीही जलद वा प्रभावी माध्यम असले तरी वाचन हाच ज्ञान मिळवण्यासाठी सर्वोत्तम स्रोत आहे हे समजून तरुण पिढीने वाचन करायला हवे. डिजिटल युगात AI गरजेचे आहे परंतु त्याचा सर्वात मोठा तोटा हा आहे की AI साठी सर्वात जास्त पाणी वापरण्यात येते कारण AI ऊर्जा आणि पाणी यांची मागणी करते. AI चा वापर काळाची गरज असली तरी निसर्गाची देखभाल हे तरुणांचे कर्तव्य आहे. जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा त्या घटनेचा चांगला व वाईट परिणाम अशा दोन्ही बाजूने चिकित्सा करायला हवी. मतदान करणे हा आपला अधिकार आहे. सध्याची ‘Gen Z’ पिढी ही तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये अत्यंत कुशल आहे. या पिढीने आपल्या वडीलधाऱ्यांनाही AI या तंत्रज्ञानाची ओळख करून द्यायला हवी.”

Related Post

error: Content is protected !!