Sat. Apr 25th, 2026

ईकबाल शेख यांचा स्वगृही राष्ट्रवादीत राज्यमंत्री ना.भरणे यांच्या उपस्थितीत प्रवेश

Spread the love

ईकबाल शेख यांचा स्वगृही राष्ट्रवादीत राज्यमंत्री ना.भरणे यांच्या उपस्थितीत प्रवेश

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क)

कळंब ग्रामपंचायत सदस्य ईकबाल शेख यांनी राज्यमंत्री नामदार दत्तात्रय (मामा) भरणे यांची भेट घेऊन मा. जिल्हा परिषद सदस्य प्रताप (आबा) पाटील, जेष्ठ मधुकर (बापु) पाटील,पंचायत समिती सदस्य सुहास दादा डोंबाळे पाटील, यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वगृही परतले
वाॅर्ड क्र.४ मधिल रस्ते व सार्वजनिक कामे तसेच कळंब ग्रामपंचायतीच्या रखडलेल्या सर्वांगिण विकासासाठी होणारी अडचण लक्षात घेता विना शर्थ पाठिंबा दिला.यावेळी नामदार श्री दत्तात्रय ( मामा) भरणे यांनी कळंब गावातील वाॅर्ड क्र.४ मधिल फडतरे पुल ते ज्ञानदिप सोसायटी,रामवाडी ते खंडागळे वस्ती, कुंभार वस्ती,तीन टाॅवर ते गुलमोहर सोसायटी या अंर्तगत रस्त्यांकरीता प्रत्येकी १० लाख रुपये असे एकूण तीस लाख रुपये तातडीने मंजूर करून कळंब गावच्या चौफेर विकासासाठी आणखी भरीव निधी देणार असल्याची ग्वाही नामदार भरणे मामा यांनी यावेळी उपस्थितांना दिली.याप्रसंगी शिवतेज ग्रुपचे अध्यक्ष प्रतापराव चवरे, कळंब ग्रामपंचायतीचे सरपंचअतुल सावंत, कळंब ग्रामपंचायत सदस्य  योगेश डोंबाळे पाटील ज्ञानेश्वर मेटकरी, राजेंद्र डोंबाळे-पाटील,संदिप पाटील, प्रमोद खंडागळे, सागर कोळी ,
राहुल अर्जून, दादासाहेब डोंबाळे-पाटील,अन्वर शेख उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!