Sat. Apr 25th, 2026

फळांच्या खाली लपवून आणला १ हजार ८७८ किलो गांजा! ६ जणांना अटक

Spread the love

फळांच्या खाली लपवून आणला १ हजार ८७८ किलो गांजा!
६ जणांना अटक

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

पुण्यामध्ये तब्बल १ हजार ८७८ किलोंचा गांजा लपवून आणण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांनी हाणून पाडला असून या कटात सहभागी असलेल्या ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
या मालाची एकूण किंमत जवळपास ३ कोटी ७५ लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर गांजा दाखल करण्याचा या टोळक्याचा प्लॅन फसला आहे.
या प्रकरणी अजून काही लोकांचा समावेश आहे का?
याचा आता पुणे पोलीस तपास करत आहेत.
अननस, जॅक फ्रूटच्या खाली लपवला गांजा पुणे-सोलापूर रोडवरून अननस आणि जॅक फ्रूटची वाहतूक करणार्‍या ट्रकमध्ये १ हजार ८७८ किलो गांजा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
या गांजाची किंमत ३ कोटी ७५ लाख रुपये आहे.
या प्रकरणी पुणे पोलिसांनी राजू गोंधवे, श्रीनिवास पवार, विलास पवार, धर्मराज शिंदे, अभिषेक घावटे आणि विनोद राठोड या सहा जणांना अटक केली आहे.
आंध्रप्रदेशातून आणला होता गांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुणे सोलापूर रोडवरून टी.एस. ०७ यू.ए.ए. ७९७९ या क्रमांकाचा आयशर ट्रक जात होता.
या ट्रकमध्ये अननस आणि जॅक फ्रूट होते.
पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता,
त्यामध्ये फळांचे ४० बॉक्स आढळले.
त्या बॉक्सच्या खाली गांजाच्या पिशव्या आढळून आल्या.
त्यामध्ये १ हजार ८७८ किलो गांजा होता.
त्याची ३ कोटी ७५ लाख रुपये इतकी किंमत होत
असल्याचे सांगण्यात आले.
तर या प्रकरणी सहा आरोपींना ताब्यात घेतल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
त्यांनी आंध्रप्रदेशातून गांजा आणल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
या प्रकरणी अनेक जणांचा सहभाग असण्याची शक्यता असून त्यांचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Post

error: Content is protected !!