Sat. Apr 25th, 2026

दौडचे लोकप्रतिनिधी पत्रकारांमध्ये वेगळा संदेश देत आहेत – एम.जी.शेलार

Spread the love

दौडचे लोकप्रतिनिधी पत्रकारांमध्ये वेगळा संदेश देत आहेत – एम.जी.शेलार

दौंड  दि, 10 — दौंड तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे मर्जीतील पत्रकाराना ” कोरोना योद्धा ” पुरस्कार देऊन दौंड तालुक्यातील  पत्रकार यांचे मध्ये वेगळा संदेश देत असून त्यांनी असे भेदभाव करणे योग्य नसल्याचे मत जेष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र पत्रकार परिषदेचे पुणे प्रतिनिधी एम.जी. शेलार यांनी व्यक्त केले आहे,
प्रसिद्धी साठी देण्यात आलेल्या पत्रकात शेलार पुढे म्हणतात, दि, 4 जुलै रोजी केडगाव येथे झालेल्या कै, माजी आमदार सुभाष आण्णा कुल स्मृतिदिन कार्यक्रमात  आमदार कुल यांनी कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या खास मर्जीतील 6 पत्रकारांना ” कोरोना योद्धा ” पुरस्कार देऊन सन्मान केला आहे, पत्रकारांचे सन्मान करणे हे लोकप्रतिनिधी यांच्या उदात्त विचारांचे आदर मानून पत्रकार याना पुरस्कार दिला याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करीत आहे,
लोकप्रतिनिधी यांनी पत्रकारांना पुरस्कार देताना कोणाला द्यावे हा त्यांच्या मर्जीचा विषय आहे, परन्तु पत्रकारांना पुरस्कार देताना ती आपल्या खास मर्जीतील लोकांना दिला तर त्याचा वेगळा संदेश बाहेर जातो, लोकप्रतिनिधी तालुक्यात वेगाने विकास कामे करीत आहेत, त्यांच्या कामाचे वृत्ताकन सर्वच पत्रकार तत्परतेने करीत असतात, मग पुरस्कार मात्र तालुक्यात अंदाजे 70 ते 80 पत्रकार असताना मर्जीतील 6 च लोकांना कसा दिला गेला, यासह तालुक्यात विशेषतः लोकप्रतिनिधी यवत येथील विश्राम गृह येथे तालुक्याच्या विकासासाठी अनेक वेळा बैठका घेतात, यामधून चांगला निर्णयही होती, मात्र त्यावेळी ते मर्जीतील पत्रकारांना बोलावतात, त्यांचे जेव्हढे असतील ते पी,ए, साहेब हे सुद्धा प्रसिद्धीसाठी मर्जीतील पत्रकार यांनाच माहिती पाठवतात, याबाबत यापूर्वी मत नोंदवले असतानाही त्यांनी दखल घेतली नाही,
खाजगीत लोकप्रतिनिधी यांनी मर्जीतील पत्रकारांना जीवापाड जपून सर्वत्या सेवा सुख सुविधा जरूर द्याव्यात, परन्तु सार्वजनिक ठिकाणी सर्वच पत्रकारांना दुजाभाव न करता समान समजून तशी समानतेची वागणूक द्यावी, या माफक अपेक्षा आहेत,
विशेष-  लोकपतिनिधी ओंकार थोरात साहेब हे ही दुजाभाव करण्यात पुढेच असतात, ते अन्य पत्रकारांशी बोलण्याचेही टाळतात, मर्जीतील सहा पत्रकार यांनाच पुरस्कार का दिला? अन्य पत्रकार याना का दिला नाही? ही पार्सलिटी नव्हे काय? आणि ती योग्य नव्हे असे विचारले, यावर ते म्हणाले हे सहाच पत्रकार कार्यक्रमास आल्याने त्यांनाच पुरस्कार दिले, अन्य पत्रकारांनाही पुरस्कार देण्यात येणार आहेत, असे नेहमीच्या सवयीने उत्तर दिले आहे.

Related Post

error: Content is protected !!