सोमवारी मंदिरं उघडण्यासाठी भा.ज.पा.चे राज्यव्यापी शंखनाद आंदोलनnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnमहाराष्ट्रात करोना निर्बंधामध्ये सूट दिल्यानंतर अनेक गोष्टी सुरु झाल्या आहेत.nयामध्ये लोकलपासून, दुकाने, हॉटेल यांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे.nमात्र महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.nसरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.nदरम्यान, भा.ज.पा. आध्यात्मिक समन्वय आघाडीने तर्फे सोमवार ३० ऑगस्ट पासून राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात येणार आहे.nश्रीकृष्णजयंती आणि चौथ्या श्रावण सोमवारच्या मुहूर्तावर भा.ज.पा. आध्यात्मिक समन्वय आघाडी तर्फे सकाळी ११ वाजता राज्यव्यापी शंखनाद आंदोलन होणार असल्याची घोषणा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.nया आंदोलनाला भा.ज.पा. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाठींबा दिला आहे.nयाबाबत भा.ज.पा.चे मुकुंद कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.nत्यांनी एक पत्र प्रसिद्ध केले आहे.nत्यात म्हटले आहे की,n“ठाकरे सरकारने पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुन्हा बंद करुन ठेवली आहेत.nआता सर्व व्यवहार सुरळित केले असताना फक्त मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत.nमंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीवीकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होते आहे.nत्यांना राज्य सरकार कोणतीही आर्थिक मदत देत नाही आणि मंदिरे देखील उघडली जात नाहीत.nदेशातल्या अन्य राज्यात मात्र मंदिरे सुरु आहेत.nम्हणुनच देव-धर्मावर सातत्याने अन्याय करणाऱ्या, देवी-देवतांना बंदिस्त करुन लाखो गरीबांची उपासमार करणाऱ्या ठाकरे सरकारला मंदिरे खुली करण्याचा इशारा देण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात येणार आहे.”