Uncategorized

राज्य शिक्षक पुरस्काराचा शिक्षण विभागाला विसर !

राज्य शिक्षक पुरस्काराचा शिक्षण विभागाला विसर !nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षण क्षेत्र विस्कळीत झालेले असताना  केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने कोरोना काळातही शिक्षक पुरस्काराची प्रक्रिया पूर्ण करून पुरस्कार जाहीर केले.nमात्र राज्याच्या शिक्षण विभागाला राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचा विसर पडला असून,nदोन वर्षांचे पुरस्कार प्रलंबित राहिले आहेत.nया पुरस्कारांसाठी शिक्षकांकडून प्रस्ताव मागवले जातात.nत्यानंतर आलेल्या प्रस्तावांची छाननी, मुलाखती आदी प्रक्रिया पार पाडून पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे जाहीर केली जातात आणि शिक्षक दिनी पुरस्कार प्रदान करण्यात येतात.nमात्र कोरोना काळात ही प्रक्रियाच शिक्षण विभागाने राबवली नाही.nत्यामुळे गेल्या वर्षीच्या आणि यंदाच्या अशा दोन वर्षांची प्रक्रिया प्रलंबित आहे.nकेंद्रीय शिक्षण मंत्रालयाने कोरोना काळात प्रक्रियेमध्ये बदल करून शिक्षक पुरस्कारांची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवून पुरस्कार जाहीर केले,nतर राज्याच्या शिक्षण विभागाला अडचण काय ?,nकोरोना काळात शिक्षक अथकपणे काम करत असताना पुरस्कारापासून वंचित का ठेवले जात आहे ?nअसे प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहेत.nकाही जिल्हा परिषदांनीही  पुरस्काराची प्रक्रिया राबवली आहे,nअसे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालेले विक्रम अडसूळ यांनी सांगितले.nराज्य शिक्षक पुरस्काराची प्रक्रिया राबवण्याबाबत शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना प्राप्त झालेल्या नाहीत.n– दत्तात्रय जगताप,nप्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक राज्य शिक्षक पुरस्कारांची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवणे शिक्षण विभागाला सहजच शक्य होते.nपण शिक्षक पुरस्काराची प्रक्रिया दोन वर्षे न राबवण्यामागे राज्याच्या शिक्षण विभागाची अनास्था कारणीभूत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *