Uncategorized

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबत संघटनेचा रौप्य महोत्सव साजरा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबत संघटनेचा रौप्य महोत्सव साजराnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचा रौप्यमहोत्सव व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव असा दुग्धशर्करायोग पुणे येथील धर्मादाय आयुक्तालयात जुळून आला. कार्यालयातील ध्वजारोहण समारोह धर्मादाय सह आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांचे हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी उपायुक्त नवनाथ जगताप, सहाय्यक आयुक्त अमरदीप तिडके, राहूल चव्हाण व राणी मुक्कावार उपस्थित होत्या. कार्यालयातील अधिक्षक सुनिता तिकोने, रुपेश गायकवाड, अभिजीत अनाप व क्रांती जाधव तसेच सर्व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.nयाप्रसंगी महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी या संस्थेचे सुनिल भिडे यांनी मानवाचे निसर्गाशी नाते यावर माहितीप्रद व्याख्यान दिले. त्यानंतर उपस्थितांना कृष्णतुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले.nपब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशन या येथील वकील संघाने सर्वांसाठी अल्पोपहार व चहापानाचे आयोजन केले होते. या प्रसंगी अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागिरदार, सचिव ॲड. सुनिल मोरे, खजिनदार ॲड. रजनी उकरंडे, ॲड. दिलीप हांडे, ॲड. रंगनाथ ताठे, ॲड. मुकेश परदेशी, ॲड. हेमंत फाटे, ॲड. मुकुंद आगलावे, ॲड. रणजीत पाटील, ॲड. तानाजी गायकवाड, ॲड. रोहिणी पवार, ॲड. साधना बाजारे, ॲड. गायत्री पंडित, ॲड. अश्विनी ठाकरे, ॲड. संतोषी पासलकर ॲड. सुहासिनी लांडगे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *