Uncategorized

प्रवीण मसाले वाले ट्रस्ट मार्फत “शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांना “पुस्तकं संच भेट “

प्रवीण मसाले वाले ट्रस्ट मार्फत “शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांना “पुस्तकं संच भेट “nnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnइंदापूर, दि.3 जुलै : पुणे येथील प्रवीण मसाले वाले ट्रस्ट मार्फत इंदापूर तालुक्यातील 77 शासनमान्य सार्वजनिक वाचनालयास गुरूपोर्णिमा दिनाचे औचित्य साधून एकूण 40 पुस्तकाचा संच भेट देण्यात आला.nnया वेळी प्रवीण मसाले वाले ट्रस्ट चे समन्व्यक पोपट काळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.nnहा कार्यक्रम इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे तालुका वाचनालय इंदापूर येथे आयोजित केला होता.nn nnया कार्यक्रमांस पुणे जिल्हा ग्रंथालय संघांचे कार्यवाह सोपान पवार, संचालक अंबादास कवळे, माजी संचालक राजेंद्र घोरपडे, रामभाऊ जामदार, तसेच संभाजी देवकर,शहाजीराजे भोसले, संतोष भोसले,सुरेश देवकर, अरुण क्षीरसागर, जयश्री वाकसे, देशपांडे मॅडम, इ मान्यवर उपस्थित होते.nnया कार्यक्रमाचे प्रस्तविक व सूत्रसंचालन सचिन तरंगे यांनी तर आभार तालुका वाचनालयच्या ग्रंथपाल संध्या दंडवते यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *