Uncategorized

मंत्रिमंडळ विस्तार : पंतप्रधानांच्या निवासस्थानी आज महत्त्वाची बैठक;

मंत्रिमंडळ विस्तार :nपंतप्रधानांच्या निवासस्थानी आज महत्त्वाची बैठक;nनारायण राणेंसह ‘या’….. नेत्यांची नावे चर्चेतn

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnमागील काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असून,nत्यासंदर्भात बैठका सुरू आहेत.nउत्तर प्रदेशसह पाच महत्त्वाच्या राज्यांतील विधानसभा निवडणुका होत असून,nत्यानुषंगाने केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रक्रियेला वेग आला आहे.nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भा.ज.पा.चे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह महत्त्वाचे मंत्री आणि भा.ज.पा. नेत्यांची बैठक बोलावली आहे.nबैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होणार असून,nयाच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याचं वृत्त आहे.nया मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांच्यासह इतर नेत्यांना स्थान दिलं जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.nत्याचबरोबर इतर नेत्यांचीही नावे चर्चेत आहेत.nकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असून,nकेंद्राकडून वेगवान हालचाली सुरू आहेत.nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सातत्याने मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री आणि भा.ज.पा.तील नेत्यांशी चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *