Uncategorized

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार – खासदार सुप्रिया सुळे…हर्षवर्धन पाटील यांचा जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार – खासदार सुप्रिया सुळेnnscreenshot 20241024 225507 instagramnnहर्षवर्धन पाटील यांचा जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखलnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क ) दि. २४, इंदापूर : महाराष्ट्र हा सध्याचा भ्रष्टाचारी सरकारपासून मुक्त करायचा आहे तसेच दूध कांदा सोयाबीन आधी पिकांना चांगला भाव देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे महाराष्ट्र राज्य हे देशात एक क्रमांकाचे राज्य बनवायचे आहे निवडणूक नंतर महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची करावी अशा वाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर येथे गुरुवारी दि. २४ रोजी केले.nnमाजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून गुरुपुष्पामृताच्या मुहूर्तावर भव्य रॅली काढून अर्ज दाखल केला या यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भाग्यश्री निवासस्थानी हर्षवर्धन पाटील यांचे खासदार सुप्रिया सुळे भाग्यश्री पाटील अंकिता पाटील ठाकरे यांनी औक्षण केले उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आयोजित महाविकास आघाडी कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीचीच मेळाव्यानंतर चर्चा सुरू होती.nn nn

screenshot 20241024 225119 instagram
खासदार सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, राज्याच्या  विकासाच्या दृष्टीने ही निवडणूक टर्निंग पॉईंट ठरणार आहे. हर्षवर्धन पाटील हे राज्य पातळीवर काम करणारे नेते आहेत. त्यांना आता राज्यभर काम करावे लागणार आहे. आपण मुंबईला जाऊ या असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले.
nnकाही लोक तिकिटासाठी दिल्लीला गेले, आपण सगळे महाराष्ट्रा मध्ये ठरवतो, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या घटक पक्षाला लगावला. त्यांच्याकडून कॉन्ट्रॅक्ट दिले जाते, ते पैसे घेतात त्यामुळे कामाची गुणवत्ता राहत नाही, आपणास खड्डे मुक्त रस्ते तयार करायचे आहेत असे सुप्रियाताई यांनी नमूद केले.nnहर्षवर्धन पाटील भाषणात म्हणाले महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचे एवढे ज्येष्ठ नेते कोणीच नाही, 84 वर्षाचे संघर्ष योध्ये शरद पवार साहेबांना विद्यमान आमदाराने धोका दिला आहे, त्यामुळे त्यांची जागा मतदारांनी दाखवून द्यावी.nnशरद पवार साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीच्या असल्याने, आता इंदापूर तालुक्यात विधानसभेला बदल घडणारच असा विश्वास हर्षवर्धन यांनी व्यक्त केला. जेष्ठ नेते शंकरराव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंदापूर तालुक्यात सर्व धर्म समभावाचा विचार मांडला त्या सर्व धर्म स्वभावाचे विचारानुसार आम्ही कार्यकर्ते वाटचाल करीत आहोत. आगामी पाच वर्षात इंदापूरचा चेहरा मोहरा बदलायचा आहे, तालुक्याचा सर्व क्षेत्रातील विकास करायचा आहे, तालुक्यातील शेतीच्या सिंचनाचा प्रश्नही प्राधान्याने सोडविला जाणार आहे, अशी ग्वाही हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या भाषणात दिली.nnयावेळी पृथ्वीराज जाचक, मुरलीधर निंबाळकर, राहुल मखरे, तेजसिंह पाटील, ॲड. कृष्णाजी यादव, विलासराव वाघमोडे, भारतीताई शेवाळे, सागरबाबा मिसाळ, नितीन शिंदे, काका देवकर, कृष्णाजी ताटे, अनिल पवार, संजय शिंदे, बाबासाहेब खराडे यांनी मनोगत व्यक्त केले. पवार मेंबर यांनी कार्यकर्त्यांसह तसेच बावडा ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कांबळे, सुनील साबळे, विनोदकुमार जाधव, यांनी असंख्य सहकार्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. यांचा सत्कार खासदार सुप्रिया सुळे व हर्षवर्धन पाटील यांनी केला.nnयावेळी निरा-भिमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, अंकिता पाटील-ठाकरे, महारुद्र पाटील, राजवर्धन पाटील, महिला तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर, कार्याध्यक्षा आसमा मुलानी, मयूरसिंह पाटील, अमोल भिसे, सुखदेव घोलप, आशुतोष भोसले, उदयसिंह पाटील,ॲड. हेमंत नरूटे, उमेश घोगरे, चांगदेव घोगरे, शहराध्यक्ष नियामत काझी, महिला अध्यक्ष रेश्मा शेख, बाळासाहेब डोंबाळे-पाटील, नंदकुमार सोनवणे, प्रदीप पाटील, मोहन दुधाळ, पांडुरंग शिंदे, शिवाजी हंगे, बाबू कोकाटे आदिसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेसचे व विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन कैलास कदम व राजेंद्र पवार यांनी तर आभार ॲड. शरद जामदार यांनी मानले.nnचौकट :n• इंदापूरची तुतारी मंत्रालयात जाणार – खासदार सुळेnnराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्र पवार यांनी इंदापूरची तुतारी मंत्रालयात पोहचणार अशी ग्वाही दिली होती याचा संबंध घेऊन सुप्रिया सुळे यांनी तुतारी विधिमंडळाबरोबर मंत्रालयात पोहचणार असल्याचे नमूद करताच कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *