nnइंदापूर शहरातील श्री संत सावतामाळी महाराज मंदीर,बावडावेस माळीगल्ली येथे श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज पुण्यतीथी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.दि.२७ जुलै रोजी सकाळी सात वाजता सावता महाराज पालखी नगर प्रदक्षीणा करण्यात आली.nत्यानंतर १० ते १२ या वेळेत विश्व वारकरी संघटना इंदापूर तालुका उपाध्यक्ष ह.भ.प.श्री उमराव महाराज देवकर यांचे काल्याचे किर्तन झाले.व नंतर फुले टाकण्याचा कार्यक्रम व शेवटी महाप्रसाद कार्यक्रमाने पुण्यतीथी सोहळ्याची सांगता झाली.nnश्री संत सावतामाळी महाराज पण्यतीथी निमीत्त मंदीर समीतीच्या वतीने सलग तीन दिवस मंदीरात किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.याप्रंसगी दि.२५ जुलै रोजी ह.भ.प.संतोष महाराज मगर,भाटनिगाव,दि.२६ रोजी ह.भ.प.अॅड.शेषागर महाराज बोबडे,गलांडवाडी नं.२,आणि दि.२७ रोजी ह.भ.प.उमराव महाराज देवकर यांचे किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.किर्तन कार्यक्रमाला श्रीराम भजनी मंडळ,श्री संत नामदेव महाराज भजनी मंडळ,इंदापूर यांचा सहयोग लाभला.nnया प्रसंगी सावतामाळी मंदीर देवस्थान समीतीचे अध्यक्ष उत्तम शिंदे, सचिव मधुकर शिंदे, विश्वस्त राजेश शिंदे, संजय शिंदे,राजु गदादे,सुरज शिंदे, प्रशांत शिंदे,युवराज शिंदे,अनंता शिंदे,रोहीत शिंदे,बंटी शिंदे,राकेश शिंदे,सधाकर ढगे,तळशिराम शिंदे इत्यादी प्रमुख उपस्थित राहुन पुण्यतीथी सोहळा उत्साहात साजरा केला.n—————————————————————————nचौकट.प्रल्हाद राऊत गुरूजी समाज भुषण पुरस्काराने सन्मानित.nnसंत सावतामाळी महाराज मंदीर सावतामाळीनगर इंदापूर येथे सावतामाळी महाराज पुण्यतीथी सोहळा संपन्न झाला.यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद राऊत (गरूजी) यांना समस्त माळी समाजाच्या वतीने समाज भुषण पुरस्कार देवन सन्मानित करण्यात आले.n————————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *