चित्रीकरणासाठी ‘द पुणे स्टुडिओ’ची निर्मिती,nबालगंधर्व जयंतीनिमित्त कलाकारांच्या सेवेत रुजू……nnपुणे : जाहिरात, रिअॅलिटी शो आणि दूरचित्रवाणी मालिकांचे चित्रीकरण करायचे आहे,nतर प्रत्येक वेळी मुंबईला जाण्याची गरज नाही.nकर्वे रस्ता परिसरात आता ही सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या ‘द पुणे स्टुडिओ’ची निर्मिती करण्यात आली आहे.nसंगीत रंगभूमीवरील नटसम्राट बालगंधर्व यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘द पुणे स्टुडिओ’ कलाकारांच्या सेवेत रुजू होत आहे.nकर्वे रस्त्यावर एस.एन.डी.टी. महाविद्यालयासमोर ‘द बॉक्स’ या अभिनव नाटय़गृहाजवळच ‘द पुणे स्टुडिओ’ कार्यरत झाला आहे.nशुभम जोशी, स्नेहा गरुड आणि चेतन धोत्रे या तिघांनी ‘ट्राय स्पिरीट प्रायव्हेट लिमिटेड’च्या माध्यमातून एकत्र येत या स्टुडिओची निर्मिती केली आहे.nसर्व कलाकारांच्या हस्ते सायंकाळी पाच वाजता स्टुडिओचे उद्घाटन होणार आहे.nया कार्यक्रमात पुणे महापालिकेने जाहीर केलेल्या बालगंधर्व पुरस्कारप्राप्त कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे.nचेतन धोत्रे म्हणाले,nमुंबईतील आर. के. स्टुडिओ आणि प्रेमा स्टुडिओच्या धर्तीवर पुण्यामध्ये बहुउद्देशीय चित्रीकरण स्टुडिओची निर्मिती केली आहे.nजाहिराती, रिअॅलिटी शो किंवा मालिकांच्या चित्रीकरणासाठी कलाकार आणि तंत्रज्ञांना मुंबईला जावे लागते.nमुंबई प्रवासाचा खर्च, स्टुडिओचे भाडे यावर निर्मात्यांचा खर्च होतो.nया स्टुडिओमुळे मुंबईला जाण्याचे टाळले जाईल आणि मुंबईतील स्टुडिओमध्ये आकारल्या जाणाऱ्या भाडय़ापोटी द्याव्या लागणाऱ्या रकमेच्या निम्म्या दरात हा स्टुडिओ देण्यात येणार आहे.nया स्टुडिओमध्ये दोन ठिकाणी चित्रीकरण करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.